Home स्टोरी आरोग्य विभागातील ११ हजार पदांच्या भरती! 

आरोग्य विभागातील ११ हजार पदांच्या भरती! 

170

२९ ऑगस्ट वार्ता: राज्यातील . पोलीस भरती, वनभरती व तलाठी भरती प्रक्रियेची जाहिरात निघाल्यानंतर व ही भरती प्रक्रिया सुरू झाल्यानंतर आता सरकारकडून आरोग्य विभागातील ११ हजार पदांच्या बंपर भरतीची घोषणा करण्यात आली आहे. आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी ही घोषणा केली आहे. आरोग्य विभागातील रिक्त असलेल्या ११ हजार पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. आरोग्य विभागात अनेक पदे रिक्त असल्याने कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर कामाचा मोठा ताण येत आहे. याबाबत सातत्याने तक्रारी येत होत्या. आरोग्य विभागाने या प्रकरणी महत्त्वाचे पाऊल उचलले असून तब्बल ११ हजार पदांची घोषणा केली आहे. आरोग्य विभागातील ११ हजार पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. आरोग्य विभागात वेगवेगळ्या पदांसाठी ही भरती असणार आहे. या भरतीत अधिकाऱ्यांची तसेच कर्मचाऱ्यांची देखील निवड केली जाणार आहे.