सावंतवाडी ता.१९: उप जिल्हा सावंतवाडीतील ट्रामा केअर युनिट, आय.सी.यु., रक्तपेढी, वैद्यकीय अधिकारी यांची रिक्त यांसर्भात तातडीने सोडवा असे आदेश आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज आरोग्य डॉ. दिलीप माने यांना दिले.
सावंतवाडी उप जिल्हा रुग्णालय कृती समितीचे निमंत्रक रविंद्र ओगले, माडखोल माजी सरपंच संजय लाड, मल्टीस्पेशालिटी जागा मालक रविंद्र केरकर, अभिनव फाऊंडेशन सिंधुदुर्ग चे प्रथमेश मुरगोड, सामाजिक कार्यकर्ते अँड.नंदन वेंगुर्लेकर, बँक आँफ बरोडाचे सेवानिवृत्त अधिकारी संपत दळवी आदींच्या शिष्टमंडळाने श्री.आबिटकर यांची आज त्यांच्या निवासस्थानी गारगोटी येथे भेट घेतली.
श्री.ओगले यांनी अभिनव फाऊंडेशनने सावंतवाडी उप जिल्हा रुग्णालय प्रश्नी दाखल केलेली जनहित याचिका, वैद्यकीय अधिकारी यांची नऊ रिक्त पदे, ट्रामा केअर युनिट मधील सर्व पाच वैद्यकीय अधिकारी यांची रिक्त पदे, व्यवस्थे अभावी गोवा-बांबुळी येथे पाठवले जाणारे पेशंट, रखडलेले मल्टीस्पेशालिटी हाँस्पिटल यासंदर्भात आरोग्यमंत्री यांचे लक्ष वेधले.
सावंतवाडी उप जिल्हा रुग्णालय कृती समितीच्यावतीने श्री.आबिटकर यांना निवेदन सादर करण्यात आले. सावंतवाडीत उप जिल्हा रुग्णालयाच्या प्रश्नासंदर्भात 26 जानेवारीला उप जिल्हा रुग्णालया समोर लाक्षणिक उपोषणाचा ही इशारा समितीने दिला आहे. या संदर्भात आवश्यक तर मंत्रालयस्तरावर बैठकीच्या सूचना द्याव्या लागतील, अशी चर्चा झाली. गेली कित्येक वषेँ सावंतवाडी येथील उप जिल्हा रूग्णालयाचा प्रश्न रखडला आहे. अत्यवस्थ स्थितीत रुग्णांवर जिल्ह्यात उपचार होत नाहीत. त्यांना बांबुळी, कोल्हापूर येथे हलवावे लागते. हा जीवघेणा प्रवास आता तरी थांबवावा, अशी मागणी आरोग्यमंत्री यांच्याकडे निवेदनाव्दारे करण्यात आली.
श्री.आबिटकर यांनी निवेदन स्विकारुन तातडीने उपसंचालक डॉ. माने यांच्याशी मोबाईल वर संपर्क साधला. सावंतवाडी उप जिल्हा रुग्णालय कृती समितीने मांडलेल्या प्रश्नासंदर्भात उपसंचालक यांनी स्वतः जातीने लक्ष घालावे. या प्रश्नांचा निपटाणारा करावा. कृती समिती च्या शिष्टमंडळाशी चर्चा करुन मागँ काढावा अशा सूचना आरोग्यमंत्री आबिटकर यांनी दिल्या.







