भावी पिढीसाठी असे उपक्रम दिशादर्शक ठरतील:- उपजिल्हाअध्यक्ष सुधीर राऊळ
आरोंदा प्रतिनिधी: आरोंदा गावातील श्री देवी सातेरी भद्रकाली वर्धापन दिनाचे औचित्यसाधुन आरोंदा गावातील समस्त ग्रामस्थांच्या वतीने शिवकालीन वस्तुंचे भव्य प्रदर्शन भरवण्यात आले होते. हे प्रदर्शन भावी पिढीला उपयुक्त मार्गदर्शन घडवणारे ठरेल. या कार्यक्रमास आलेल्या सर्व भक्त भाविकांनी आणि शिवप्रेमीनी या शिवकालीन वस्तुंच्या प्रदर्शनास येऊन वस्तुची माहीती घेतली. या कार्यक्रमाचे संयोजक सौ. ममता भोसले श्री. पंकज भोसले यांनी चांगल्या प्रकारे लोकांना मार्गदर्शन केले.
यावेळी मनसे सावंतवाडी तालुका अध्यक्ष मिलींद सावंत, आरोंदा ग्रामपंचायत सदस्य नरेश देऊलकर, विभाग अध्यक्ष अजित पोळजी, उद्योजक संदेश परब, राजू नाईक, अभिषेक रेगे उपस्थित होते. सर्व आयोजक आणि आरोंदा ग्रामस्थांचे मनसे च्या वतीने आभार मानण्यात आले.