Home स्टोरी आरवली सोन्सुरा ग्रामस्थांचा मायनिंगला विरोध कायम…!

आरवली सोन्सुरा ग्रामस्थांचा मायनिंगला विरोध कायम…!

205

आरवली: आजगाव ब्लॉक या नावाने ८४० हेक्टर एवढी प्रचंड जमीन महाराष्ट्र शासनाने JSW (जिंदाल स्टील) या प्रख्यात कंपनी ला ५० वर्ष च्या लीज वर लोह खनिज प्रकल्प उत्खनासाठी दिली आहे, या मुळे जवळ जवळ १० गावे (सावंतवाडी व वेंगुर्ला तालुक्यातील मिळून) उदवस्त होणार आहेत. आजगाव, धाकोरा, भोमवाडीमळेवाड, नाणोस, तळवणे, आरवली, सागरतीर्थ,आसोली,सोन्सूरे या गावातील जमिनी या प्रकल्प च्या मॅप मध्ये दिसत आहेत.

सदरच्या जमिनी मध्ये ग्रामस्थांच्या जमिनी, काजू, आंबा, सुपारी, माड, सुरंग कळा, कोकम etc च्या बागायती आहेत, तसेच घरे आहेत विविध प्राणी,पक्षी, औषधी वनस्पती, पाणवठे, विहिरी, प्राचीन मंदिरे याचा समावेश आहे हि सर्व निसर्ग समृद्ध गावे नष्ट होणार आहेत.

जवळील कळणे, रेडी गाव यांचे जिवंत उदाहरण असताना आपण या विनाशकारी प्रकल्प आपल्या गावात येण्यापूर्वीच सावध व्हा. ग्राम पंचायत चा “ना हरकत दाखला “या पैकी एका ही गावाने दिलेला नाही असे असताना ग्रामस्थांना विश्वासात न घेता परस्पर ही मायनींग लीज ३० मार्च २०२२ देण्यात आली, या आधी ग्रामसभा घेऊन ग्रामस्थांनी विरोध नोंदवला व तसे कलेक्टर कडे पत्र दिलेले असताना पुन्हा jsw कंपनी कडून स्ट्रीगर जिओ science या कंपनीस “ड्रोन सर्व्हे व tropiking “म्हणजेच कोणत्या भागात किती लोह खनिज किती खोल आहे इत्यादी सर्व्हेक्षण ला पाठविण्यात आले आहे.

८ जुलै ते ३१ जुलै २०२४ ही मुदत त्या कंपनी स JSW ने दिली आहे. हा सर्व आपल्यावर अन्याय असून आपण सर्व जर एकत्र आलो नाही तर उद्या सम्पूर्ण सिंधुदुर्ग उद्धस्त व्हायला वेळ लागणार नाही यासाठी मी हात जोडून सर्व सरपंच -उपसरपंच, लोकप्रतिनिधी, प्रकल्प विरोधक यांना विंनती करतो की तुम्ही जनजागृती करून या लढ्यास पाठींबा द्या एकजूटिने हा विनाशकारी प्रकल्प हद्दपार करुया.

मायनींग सारखे प्रदूषणकारी,आरोग्यास व पर्यावरणास घातक प्रकल्पास विरोध आज केले गेले नाहीत तर असे विनाशकारी प्रकल्प आपल्या माथी कायमच लादले जातील आणि आपल स्वर्गिय कोकण लोभ पावेल याची काळजी आत्ताच घ्यायला हवी.