Home राजकारण आम्ही सामनाच्या अग्रलेखाला महत्त्व देत नाही! शरद पवार

आम्ही सामनाच्या अग्रलेखाला महत्त्व देत नाही! शरद पवार

69

सिंधुदुर्ग प्रतिनिधी: शरद पवार हे राष्ट्रीय पातळीवर मोठे नेते आहेत. त्यांच्या शब्दाला राष्ट्रीय राजकारणात मान आहे. मात्र, पक्ष पुढे नेईल असा वारसदार निर्माण करण्यात ते अपयशी ठरले आहे. त्यामुळेच निवृत्तीची घोषणा करताच पक्ष बुंध्यापासून हादरला व प्रत्येक जण आता आपले कसे होणार? या चिंतेने हादरून गेला”, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पक्षाचा वारसदार ठरविण्यात अपयश आल्याची टीका सोमवारी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून करण्यात आली होती. या टीकेला आज शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिलं. आम्ही सामनाच्या अग्रलेखाला महत्त्व देत नाही. त्यांना काहीही लिहू द्या, आम्ही आमचं काम करत असतो, असे ते म्हणाले. दरम्यान, शरद पवारांच्या या विधानावर आता ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

खासदार विनायक राऊत यांनी आज रत्नागिरीत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी राज्यातील विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. दरम्यान, यावेळी त्यांना शरद पवारांच्या विधानाबाबत विचारण्यात आलं असता, “सामनातील अग्रलेख खासदार संजय राऊत लिहितात. राजकारण आणि समाजकारण याचा गाढा अभ्यास असलेले संपादक म्हणून त्यांची ओळख आहे. त्यामुळेच ते त्यांचे विचार ‘सामना’तून मांडत असतात”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तसेच “सामनातील अग्रलेख कोणी गांभीर्याने घेवो अथवा न घेवो. मात्र, माध्यमांची रोजच्या दिवसाची सुरुवात ‘सामना’च्या अग्रलेखानेच होते, हे सुद्धा नाकारता येत नाही”, असेही ते म्हणाले.