Home स्टोरी आम्हांला फसवणाऱ्यांना आमचा पाठिंबा नाही..! स्थानिक डी एड /डि टी एड ...

आम्हांला फसवणाऱ्यांना आमचा पाठिंबा नाही..! स्थानिक डी एड /डि टी एड बेरोजगार समिती, सिंधुदुर्ग

188

सिंधुदुर्ग: निदर्शनात आलेल्या प्रसारमाध्यम बातम्यांतून डीएड बेरोजगार यांचा महायुती उमेदवाराला बिनशर्त पाठिंबा अशी एक बातमी व्हायरल होत असल्याचे समजले, हा फक्त आणि फक्त निवडणुकीच्या तोंडावर बेरोजगारीचा उफाळून आलेला मुद्दा दाबण्यासाठी डॅमेज कंट्रोल म्हणून काही बिकाऊ लोकांना हाताशी घेऊन फोटोशूट करून बिनशर्त पाठिंब्याचे ढोंग रचवून, निवडणूक प्रचाराला पाठवण्यात आले,असे समजते आहे. दबावतंत्र आणि इतर दबावाच्या आयुधांचा वापरामुळे काही टाळकी आशेवर असलेल्या, गरीब भोळ्या बेरोजगार महिलांचा राजकारणासाठी दिशाभूल करून वापर करत आहेत हा आमचा आरोप आहे, १००० पेक्षा जास्त बेरोजगार जिल्ह्यात असताना २०-३० लोक नेऊन डीएड बेरोजगारांचे मालक असल्याचे भासवून जिल्ह्यात समस्त डीएड आंदोलनकर्त्यांना आंदोलने – उपोषणे करणाऱ्यांच्या भावनांना तिलांजली देत,ज्यांनी दिढ वर्ष झुलवत ठेवले त्याच, सरसकट भरतीचा शब्द देऊनही तो शब्द आचारसंहिता लागेपर्यंत झुलवत ठेवणाऱ्या सत्ताधाऱ्यांना जाऊन मिळून, आमिषांना बळी पडून ,दबावात येऊन सत्ताधाऱ्यांनी दिलेल्या शब्दाची पूर्तता न करताच पाठींबा मिळवल्याचे हे जगातील पहिलेच उदाहरण आहे. एक व्यक्ती म्हणजे समस्त डीएड बेरोगरांचा प्रतिनिधी होत नाही. एकवेळ सत्ताधाऱ्यांनी काम नाही केले म्हणून विरोधीपक्षाला पाठिंबा दिला हे आपण समजू शकतो, पण काम न करताच पाठिंब्याची नौटंकी केली गेली, याचे लॉजिक ब्रह्मदेवाला ही सांगता यायचे नाही, या बनाव पाठिंब्याचा संघर्ष समिती जाहीर निषेध नोंदवते. आणि जाहीर करते की, सिंधुदुर्गातील डीएड बेरोजगारांनी कुठल्याही प्रकारे,कुठल्याच पक्षाला पाठींबा जाहीर केला नाही, अशा अफवांवर कृपया कुणीही विश्वास ठेऊ नये.

 

सन्माननीय राणे साहेबांनी प्रसार माध्यमांना सांगितले की, “आरोग्य विभागात जसा NRHM कर्मचाऱ्यांच्या प्रश्न सोडवला त्याच धर्तीवर डी. एड बेरोजगारांचे प्रश्न मार्गी लावू”,संघर्ष समितीचा राणे साहेबांना सवाल आहे की NRHM चा GR असे म्हणतो की, ७०% सरळसेवा भरती आणि ३०% पदे जी ते भरणार ती किमान १० वर्षेहून जास्त कार्यरत कर्मचाऱ्यांना सामावून घेणार असा आहे, मग इथे डीएड बेरोजगार आज रोजी कुठेही कार्यरत नाहीत, तर १० वर्ष सेवा पूर्ण होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही मग कोणत्या आधारावर त्यांनी हे खोटे आश्वासन दिले ?? त्या कायद्याचा इथे उपयोग होतानाच दिसत नाही, अशी खोटी आश्वासने देण्या ऐवजी त्यांनी आचारसंहिता पूर्वी योग्य वेळेत प्रश्न मार्गी लावला असता तर आज झालेले नुकसान, अंधारात गेलेले भविष्य वाचवता आले असते, आणि जिल्ह्यात राज्याचे शिक्षणमंत्री असताना राणे साहेब ही आश्वासने का देत आहेत, केसरकर साहेब यावर बोलणे का टाळत आहेत??

 

गेले दीड वर्ष राणे – केसरकर यांना कुणी अडवले होते का? सरसकट सामावून घेण्यापासून?? की त्यांना कुणी शपथ घातली होती का?? असा सवाल आज सत्ताधारी लोकप्रतिनिधींना विचारण्याची वेळ आली आहे.

गेले दीड वर्ष सिंधुदुर्गातील डीएड बेरोजगार हाल अपेष्टा सहन करत राणे आणि केसरकर यांच्या बंगल्यांच्या पायऱ्या झिजवत आहे, यांना तान्ही बाळे कडेवर घेऊन २..३ बसेस बदलत प्रवास करत, सावंतवाडी – कणकवली येरझाऱ्या का मारायला लावल्या त्यावेळी का यांना दया आली नाही का?? कारण यांची इच्छाशक्तीच नव्हती म्हणून हा विषय लटकावत ठेवत सरकारचा कालावधी संपेपर्यंत ताणत नेले. सत्ताधाऱ्यांचा बुरखा आता फाटला आहे आणि बेरोजगारांना कळून चुकले आहे, डीएड बेरोजगारांची फसवणूक केली गेली, म्हणूनच या लोकसभा निवडणुकीत समस्त स्थानिक डीएड/ डी टी एड बेरोजगार कृती समिती सिंधुदुर्ग तर्फे पुन्हा एकदा अधोरेकित करू इच्छितो की, डीएड बेरोजगारांनी कुणाला पाठिंबा वगैरे दिला नाहीय, आणि ज्यांनी फसवलं त्यांना मतदान देखील करणार नाही अशी भूमिका आज या प्रेस नोट मार्फत जाहीर करत आहोत याची सर्व डीएड बांधव भगिनींनी नोंद घ्यावी.

 

स्थानिक डीएड/ डीटी एड बेरोजगार कृती समिती, सिंधुदुर्ग.