Home स्टोरी आमदार श्री गणपत गायकवाड यांच्या विकास निधीतून कल्याण पूर्वेत निर्माण झाले कील्ल्याच्या...

आमदार श्री गणपत गायकवाड यांच्या विकास निधीतून कल्याण पूर्वेत निर्माण झाले कील्ल्याच्या प्रतिकृतीचे ‘शिवरत्न स्मारक’!

132

कल्याण प्रतिनिधी:(आनंद गायकवाड): – कल्याण पूर्वेतील सौंदर्यात भर घालण्याच्या उद्देशाने आमदार श्री . गणपत गायकवाड यांच्या सन १९२०- २१ च्या स्थानिक विकास निधीतून खडेगोलीवली परिसरात शिवरत्न स्मारकाची निर्मिती करण्यात आली आहे. या स्मारकाला शिवकालीन किल्ल्याच्या प्रतीकृतीचा आकार देण्यात आल्याने कल्याण पूर्वेत हे स्मारक शिवप्रेमींसाठी प्रेरणादायी ठरणार आहे .खडेगोलीवली येथील शिवरत्न चौकात उभारण्यात आलेले हे स्मारकाची उंची १२ फुट इतकी असुन लांबी २० मिटर तर रुंदी ८ मीटर इतकी आहे. या स्मारकासाठी साठी (जी . एस . टी . सह ) १९९९.४९ लाखाचा आमदार विकास निधी खर्च झाला आहे.

या स्मारका समोर दोन भालदार उभे करण्यात येऊन स्मारकावर शिवकालीन दोन तोफा आणि जिरेटोप ठेवण्यात आला असल्याने या स्मारकाचे ‘शिवरत्न‘ असे नामकरण करण्यात आले आहे. स्थानिक काटेमानिवली ग्रामस्त मंडळींच्या पाठपुराव्याने निर्माण करण्यात आलेले ही संपूर्ण शिल्प विशिष्ठ अशा दगडांनी बांधण्यात आल्याने या शिल्पाला शिवकालीन किल्ल्याचा लुक प्राप्त झाला आहे. या शिल्पाचे औपचारीक लोकार्पण आमदार श्री गणपत गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. या चौकाच्या सुशोभिकरणासाठी श्री . शिवप्रतिष्ठाण हिंदूस्थानचे मयूर धुमाळ यांनी आमदार श्री गणपत गायकवाड यांचे कडे व्यक्तीशः सातत्त्याने पाठपुरावा केला होता.

या स्मारकाच्या लोकार्पण समयी सकल हिंदू समाज श्री. शिव प्रतिष्ठाण हिंदुस्थान, हिंदू संस्कृती मंच, रायगड सेवा प्रतिष्ठाण, आम्ही सातारकर संघटना या संघटनेच्या प्रतिनिधींसह शिवप्रेमी नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते .