Home राजकारण आमदार वैभव नाईक यांचा भाजपला धक्का.

आमदार वैभव नाईक यांचा भाजपला धक्का.

111

नारायण राणे यांचे निकटवर्ती समर्थक नितीन पवार यांचा आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्षप्रवेश

 

मालवण प्रतिनिधी: मालवण तालुक्यातील श्रावण येथील खासदार नारायण राणे यांचे निकटवर्ती समर्थक नितीन पवार यांनी खा.राणे यांना सोडचिठ्ठी देत कणकवली विजय भवन येथे जिल्हा प्रवक्ते मंदार केणी यांच्या माध्यमातून आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे. आमदार वैभव नाईक यांनी शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले.

नितीन पवार हे खा.राणे यांचे खंदे समर्थक तसेच त्यांनी उपतालुकाप्रमुख, देवगड निरीक्षक म्हणून काम केलेले आहे.हिवाळे विभागात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आ.वैभव नाईक यांना मोठ मताधिक्य मिळवून देण्याचा निर्धार श्री नितीन पवार यांनी केला आहे.

यावेळी कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, जिल्हा प्रवक्ते मंदार केणी,माजी नगरसेवक यतीन खोत, स्वप्नील पवार आणि शिवसैनिक उपस्थित होते.