सिंधुदुर्ग: कुडाळ आरोग्य तपासणी, रक्तदान,नेत्र तपासणी,व सामाजिक उपक्रम हे आमदार वैभव नाईक यांचे लोकाभिमुख उपक्रम असुन जे लोकांना आवश्यक आहे तेच देण्याचा उपक्रम आम नाईक राबवतात असे गौरवोद्गार उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी काढले. आमदार नाईक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हुमरमळा (वालावल)येथे नेत्र तपासणी शिबीराचे दीपप्रज्वलन करून श्री पडते यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला, यावेळी श्री पडते म्हणाले कि कुडाळ मालवण मतदार संघाचे लोक प्रिय आमदार वैभव नाईक यांचा वाढदिवस कार्यकर्ते साजरा करतात, स्वतः वाढदिवस साजरा करुन नाच गाणे करुन न घेता आरोग्य तपासणी,नेत्र तपासणी, रक्तदान शिबीर व विविध सामाजिक उपक्रम कार्यक्रमांनी वाढदीवस साजरा केला जातो हाच खरा आपल्या नेतृत्वाचा अभिमान असुन सर्वसामान्य जनतेचा आमदार म्हणून आम नाईक यांची ओळख असुन येणारी २०२४ची निवडणूक जिंकुन महाराष्ट्र राज्याचे केबिनेट मंत्री म्हणून आम नाईक असतील असे पडते यांनी सांगितले.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना नेते अतुल बंगे यांनी केले.यावेळी डॉ केळकर, डॉ तेली, अतुल बंगे, कुडाळ शिवसेना ओबीसी सेल शहरं प्रमुख राजु गवंडे, कुडाळ युवासेना शहरप्रमुख संदीप म्हाडेश्वर, सरपंच सौ अर्चना बंगे, ग्रामपंचायत सदस्या सौ रमा गाळवणकर, ग्रामपंचायत सदस्य अमृत देसाई, माजी सरपंच प्रविण मार्गी, शिवसेनेचे प्रसाद परकर, समर्थ नगर स्वामी समर्थ प्रतिष्ठानचे सतिश मांजरेकर,महेश वेळकर,भाऊ गुंजकर, नारायण राणे, अमित बंगे,व इतर उपस्थित होते.