तालुक्यांतील ग्रामिण भागासाठी धार्मिक संस्कृती, क्रिडा आणि आरोग्यासाठी,स्वच्छ व शुध्द पाणी पुरवठ्यासाठी रु १ कोटीच्या वर निधीमंजूर
संजय खांबेटे :(म्हसळा प्रतिनिधी): म्हसळा तालुक्यातील मौजे कणघर येथे श्री साई मंदीरा समोर विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमासाठी सभामंडप बांधकाम रु ७ लक्ष रुपये निधी मंजुर ,चिरगाव सडकेचीवाडी येथे जलजिवन मिशन योजने अंतर्गत रु९७ लक्ष निधी देऊन पाणी पुरवठा योजना कामाचे भूमीपूजन सोहळा आणि खामगाव-कणघर पंचक्रोशींत कणघर प्रीमिअर लीग क्रिकेट सामना शुभारंभ करण्यांत आला, त्यावेळी श्रीवर्धन विधानसभा मतदार संघाच्या लाडक्या आमदार आदिती तटकरे,जिल्हा चिटणीस महादेव पाटील, जेष्ठ नेते अंकुश खडस,तालुका अध्यक्ष समीर बनकर, खामगाव सरपच मुंबई अध्यक्ष महेश शिर्के, महीला अध्यक्षा सोनल घोले, माजी सभापती छाया म्हात्रे, उपनगराध्यक्ष सुनिल शेडगे, माजी उप सभापती मधुकर गायकर,संदीप चाचले,सरपंच रश्मी सावंत,अनिल बसवत,नाना सावंत,उपसरपंच धनंजय सावंत, महेश घोले,शाहीदभाई उकये,पातेरे कणघर व चिरगाव ग्रामस्थ महीला मंडळ आणि पक्षाचे मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.