Home स्टोरी आपल्या प्रशालेपेक्षा कोणताही पुरस्कार किंवा मानसन्मान मोठा नाही! दत्तप्रसाद पेडणेकर..

आपल्या प्रशालेपेक्षा कोणताही पुरस्कार किंवा मानसन्मान मोठा नाही! दत्तप्रसाद पेडणेकर..

436

मसुरे येथे आर. पी. बागवे हायस्कूल मसुरे, मसुरे एज्युकेशन सोसायटी मुंबई च्या वतीने दत्तप्रसाद पेडणेकर यांचा हृदय सत्कार....

१३ जुलै वार्ता: मसुरे प्रतिनि: धीज्या प्रशालेमुळे आपण ज्ञान संपादन करून मोठे होतो या प्रशालेपेक्षा कोणताही पुरस्कार किंवा मानसन्मान हा मोठा नसतो. या प्रशालेचा मी माझी विद्यार्थी तसेच या संस्थेचा मी सभासद आहे हाच पुरस्कार मला सर्वात मोठा आहे. आज या प्रशालेने आणि संस्थेने माझा जो मानसन्मान केला आहे याला मी कुठेही तडा जाऊ देणार नाही, या संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर दीपक परब यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स या संस्थेच्या सभासद पदाला मी योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न करेन असे प्रतिपादन मसुरे येथे बोलताना पत्रकार दत्तप्रसाद पेडणेकर यांनी सत्कारास उत्तर देताना केले.

श्री दत्तप्रसाद पेडणेकर

आर.पी.बागवे हायस्कूल व उच्च माध्यमिक तांत्रिक विद्यालय, मसुरे आणि मसुरे एज्युकेशन सोसायटी मुंबई यांच्या वतीने मसुरे बागवे हायस्कूलच्या सभागृहामध्ये या प्रशालेचे माजी विद्यार्थी, मसुरे एज्युकेशन सोसायटी लोकल कमिटी सदस्य, जेष्ठ पत्रकार श्री दत्तप्रसाद पेडणेकर यांची महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स ऍग्री इंडस्ट्री च्या संचालक मंडळाच्या सदस्यपदी निवड झाल्यानिमित्ताने त्यांचा सत्कार मुंबई कमिटी पदाधिकारी श्री प्रसाद बागवे, श्री सुभाष बागवे, श्री संजय बागवे, प्रशालेच्या मुख्याध्यापिका अर्चना कोदे मॅडम यांच्या उपस्थितीत होते.

कमिटीतर्फे शाल व श्रीफळ देऊन तसेच प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ कोदे मॅडम यांच्या हस्ते शाळेतर्फे पुष्पगुच्छ व कल्पवृक्ष भेट देऊन, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थिती करण्यात आला..यावेळी बोलताना मुंबई कमिटीचे सदस्य, उद्योजक प्रसाद बागवे म्हणाले दत्तप्रसाद पेडणेकर यांचे कार्य अतिशय महान असून समाजासाठी, या गावासाठी या प्रशालेसाठी त्यांचे योगदान खूप मोठे आहे. त्यांची पत्रकारिता ही अतिशय प्रामाणिक असून कला, क्रीडा, समाजसेवा, पत्रकारिता,आरोग्य, शैक्षणिक क्षेत्र आणि गोरगरीब जनतेची सेवा या मध्ये त्यांचे कार्य खूप मोठे आहे.या त्यांच्या गगनचुंबी कार्याचा आदर्श आपण सर्वांनी घेणे जरुरीचे आहे. सर्व मान्यवरांनी यावेळी दत्तप्रसाद पेडणेकर यांना शुभेच्छा दिल्यात. या वेळी रमेश पाताडे, भानुदास परब, सोनाली कोदे, समीर नाईक, शशांक पिंगुळकर सर, श्री हळवे सर, एन एस जाधव, बी एस ठाकूर, दयानंद पेडणेकर, चरणदास फुकट, बाबाजी मेस्त्री, विशाखा जाधव आणि शिक्षक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, ग्रामस्थ, कमिटी सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी एस ठाकूर यांनी केले व आभार रमेश पाताडे यांनी मानले.