Home स्टोरी आनंदवाडी ग्रामस्थ मंडळ मुंबई यांचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न.

आनंदवाडी ग्रामस्थ मंडळ मुंबई यांचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न.

32

मसूरे प्रतिनिधी: देवगड तालुक्यातील आनंदवाडी ग्रामस्थ मंडळ, मुंबई आयोजित १४ वें वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच भांडुप येथील गीता हॉलमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाले. सतीश कोयंडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सोहळ्याला मुंबई पोर्ट ट्रस्टचे सेवानिवृत्त अग्निशमन दलाचे अधिकारी रतनकुमार झाजम हे प्रमुख पाहुणे, तर दर्यावर्दी मासिकाचे संपादक अमोल सरतांडेल व कार्यकारी संपादक पांडुरंग भाबल हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. या प्रसंगी मंडळाचे संस्थापक धर्माजी पराडकर व मंडळाचे सर्व पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. मंडळाचे संस्थापक, अध्यक्ष व मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते श्रीं च्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून संमेलनाला प्रारंभ करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे व अतिथी यांचे गुणाजी पोसम यांनी स्वागत व परिचय करून दिल्यावर अजित पराडकर यांनी समारंभाचे सूत्रसंचालन केले.

प्रारंभी मंडळाच्या मृत सदस्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्या नंतर मुंबई पोलीस दलातील सेवानिवृत्त सहा.पो.उपनिरीक्षक दिगंबर तारी यांचा सपत्नीक तसेच माध्यमिक, शालांत, उच्च माध्यमिक व वैद्यकीय पदवीधर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी अध्यक्षांनी स्नेहसंमेलन आयोजित करण्यामागील उद्देश स्पष्ट करून मंडळाच्या वाटचालीचा थोडक्यात आढावा घेतला. त्यानंतर सर्व पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केल्यावर धर्माजी पराडकर यांनी सर्व उपस्थित ग्रामस्थ, देणगीदार, पाहुणे व पदाधिकारी यांचे आभार मानले. महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ पार पडल्यावर महिला व लहान मुलांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम धनंजय मुणगेकर व गुणाजी पोसम यांनी आपल्या खुमासदार शैलीत सादर केले. शेवटी सनेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.