पुणे: शनिवारवाडा म्हणजे छत्रपती शिवरायांनी स्थापलेल्या ‘हिंदवी स्वराज्या’चे रुपांतर मराठा साम्राज्यात करणारे बाजीराव पेशवे यांची कर्मभूमी! छत्रपतींची गादी जरी सातारा येथे असली, तरी मराठा साम्राज्याचा दरारा दिल्लीपर्यंत ठेवला तो शनिवारवाड्याने ! अशा आमच्या पराक्रमाचा वारसा सांगणाऱ्या ऐतिहासिक वास्तूमध्ये नमाजपठण आजिबात खपवून घेतले जाणार नाही. यापूर्वी पर्वती टेकडीवरील मंदिरात, नंतर सारसबागच्या गणपती मंदिरासमोर आणि आता शनिवारवाड्याच्या आत येऊन नमाजपठन झाले. आजपर्यंत रस्त्यावर नमाज पढणारे आता हिंदूंच्या ऐतिहासिक वास्तूंमध्ये नमाज पढत आहेत. यांना मशिदीत नमाज पढायचा नसेल, तर मग या मशिदी कशासाठी आहेत? रस्त्यांवर पढतात, बस-रेल्वे-विमानांमध्ये पढतात, आता आमच्या ऐतिहासिक वास्तू आणि मंदिरांत आले आहेत. हे आम्ही कदापि खपवून घेणार नाही. त्यामुळे मशिदी सोडून अन्य कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी नमाजपठणावर बंदी आणावी, *अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या कु. क्रांती पेटकर यांनी केली आहे.*
कु. क्रांती पुढे म्हणाल्या की, पुरातत्व विभाग यापुढे अशा घटना होणार नाहीत, यासाठी काय करणार आहे, हे त्यांनी जाहीर करायला हवे. तसेच हिंदूंच्या शौर्याचे प्रतिक असलेल्या शनिवारवाडा परिसरातील अनधिकृत मजार त्वरित जमीनदोस्त करावी, जेणेकरून पुन्हा असले प्रकार तेथे होणार नाहीत. ‘शनिवारवाडा कोणाच्या बापाचा नाही’, ‘सर्व जातीधर्मियांचा आहे’ असे म्हणणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की, आजचा हिंदु समाज हा छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, श्रीमंत बाजीराव पेशवे आदी महापुरुष, हिंदु योद्ध्यांच्या वंशजांचा आहे. अर्थात हे सर्व आमचे ‘बाप’च आहेत. त्यामुळे आम्हाला अभिमान आहे की, शनिवारवाडा हा आमच्या शूरवीर अशा हिंदु राजे, पेशवे, मावळे यांच्या पराक्रमाची साक्ष देणारा, आमच्या पूर्वजांचाच आहे.’

कु. क्रांती पुढे म्हणाल्या की, पुण्याच्या खासदार सौ. मेधा कुलकर्णी यांनी या प्रकरणी आवाज उठवला, याबद्दल त्यांचे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आभार मानते. मुसलमान महिलांना त्यांच्या मशिदींमध्ये नमाज पठनाला अनुमती नसते. त्या ‘बिचाऱ्या’, ‘शांतीप्रिय’ महिलांना मशिदीत प्रवेश मिळावा, म्हणून ‘सेक्युलरवादी’ महिलांनी अवश्य प्रयत्न करायला हवेत, पण त्या याबाबत मूग गिळून हिंदूंना मात्र ‘सेक्युलरिझम’ शिकवतील. मेधाताईंनी घेतलेला पुढाकार हा प्रत्येक हिंदु लोकप्रतिनिधीसाठी आदर्श आहे. हिंदूंच्या ऐतिहासिक वारशांचे जतन हिंदू लोकप्रतिनिधींनी करायचे नाही, तर काय मुसलमान लोकप्रतिनिधी येऊन शनिवारवाडा, किल्ले रायगड आदींचे रक्षण करणार आहेत का?
आज शनिवारवाड्यात नमाज पढला गेला, उद्या शनिवारवाड्यातून नगारा वाजण्याऐवजी बांग ऐकू येईल, तरीही आपण ‘सेक्युलरिझम’चे तुणतुणे वाजवणार आहोत का? काल परवापर्यंत रस्त्यावर नमाज पढले जात होते, उद्या तुमच्या घरासमोर नमाज पढायला आले, तर तुम्हाला चालणार आहे का? नमाजाच्या निमित्ताने छत्रपतींच्या वारसास्थळांना पुन्हा ‘लॅण्ड जिहाद’च्या माध्यमातून अतिक्रमित करण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी हिंदु समाजाने सावध राहिले पाहिजे, असे आवाहनही कु. क्रांती पेटकर यांनी केले.
आपली नम्र,
कु. क्रांती पेटकर,
हिंदु जनजागृती समिती,
(संपर्क : 7738233333)







