Home स्टोरी आदिपुरुष’ चित्रपट प्रमाणित होणे, ही घोडचूक ! – उच्च न्यायालय….

आदिपुरुष’ चित्रपट प्रमाणित होणे, ही घोडचूक ! – उच्च न्यायालय….

114

अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपिठाने सलग दुसर्‍या दिवशी आदिपुरुष चित्रपटाच्या निर्मात्यांना फटकारले!

२९ जून वार्ता: तुम्ही कुराणवर एखादा लहान माहितीपट बनवून त्यात काही चुकीचे दाखवा; मग काय होऊ शकते हे तुम्हाला कळेल ? कुराण, बायबललाही हात लावायला नको. मी स्पष्ट करू इच्छितो की, कोणत्याही धर्माला स्पर्श करू नका! कोणत्याही धर्माचे चुकीचे वर्णन करू नका, अशा शब्दांत अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपिठाने ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या निर्मात्यांना सलग दुसर्‍या दिवशी फटकारले. २७ जून या दिवशी झालेल्या सुनावणीतही न्यायालयाने निर्मात्यांना कठोर शब्दांत फटकारले होते.‘न्यायालय कोणत्याही धर्माचे पालन करत नाही. न्यायालय सर्व लोकांच्या भावनांचा आदर करते. या प्रकरणाविषयी आमच्या केवळ तोंडी टिपण्या आहेत. आता पहा, संध्याकाळपर्यंत हेही छापून येईल’, असेही न्यायालयाने २८ जूनच्या सुनावणीच्या वेळी पुढे म्हटले. ‘सेन्सॉर बोर्डाने दिलेले प्रमाणपत्र रहित करता येणार नाही का?’ , असा प्रश्‍नही न्यायालयाने महाधिवक्त्यांना विचारला.

उच्च न्यायालयाने केलेल्या टिपण्या!

१. ज्यातील पात्रांची पूजा केली जाते असे रामायण विनोदासारखे कसे दाखवण्यात आले?

२. सेन्सॉर बोर्डाने असा चित्रपट प्रमाणित कसा केला? चित्रपट प्रमाणित होणे, ही घोडचूक आहे. चित्रपट निर्मात्यांना केवळ पैसे कमवायचे असतात; कारण चित्रपट प्रसिद्ध होतो.

३. आम्ही चित्रपट पाहिला नाही, पण ज्यांनी चित्रपट पाहिला आहे, त्यांचे म्हणणे आहे, ‘आम्ही विचार केला, त्यापेक्षाही चित्रपट वाईट आहे.’ सूत्र असे आहे की, चित्रपटात रामायणातील पात्रे अशी का दाखवली आहेत? मी काही लोकांना विचारले, ते चित्रपट पाहून पुष्कळ दुखावले गेले. आज आपण गप्प राहिलो, तर काय होईल माहिती आहे का?, हे सर्व वाढत आहे.