Home राजकारण आदित्य ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील! आमदार सुनील शिंदे

आदित्य ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील! आमदार सुनील शिंदे

65

काल ठाकरे गटाच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आज वरळीत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात बोलतांना आमदार सुनील शिंदे म्हणाले की,. “रश्मी वहिनी तुम्ही कार्यक्रमाला आलात. ही वरळी शिवसेनेची आहे. ही वरळी उद्धव ठाकरे यांची आहे. ही वरळी आदित्य ठाकरे यांचीच असेल. वहिनी मी तुम्हाला शब्द देतो की, आदित्य ठाकरे इथूनच मुख्यमंत्री होतील. मुख्यमंत्री झाल्यानंतर याच मंचावर आम्ही त्यांचा सत्कार करु”, असं सुनील शिंदे म्हणाले. या कार्यक्रमानंतर आदित्य ठाकरे पत्रकार परिषदेत बोलतांना म्हणाले की, “चार एअरपोर्टबद्दल पाठपुरावा करतोय. पालघरमध्ये विमानतळ, औरंगाबाद जवळ एक एअर फिल्ड असावं. तसेच पुण्यातील एअरपोर्टसंदर्भात क्लॅरिटी नाही. दुसरं होईल की नाही जे आहे त्याचं एक्सटेंशन होईल की नाही यासंदर्भात कळावं. सोबतच नाशिकच्या कनेक्टिव्हिटीच्या अडचणी आहेत. कधी फ्लाईट्स असतात कधी नाही. त्यामुळे कन्सिटन्सी त्यात असावी. असं मत व्यक्त करत “अजून मंत्रिमंडळात एकही महिला नाही ही खंत आहे. टीव्हीवर मंत्र्यांकडून महिलांचा अपमान केला जातोय. महिलांना शिव्या देणारे देखील मंत्रिमंडळात आहेत. असं आदित्य ठाकरे म्हणाले.