Home स्टोरी आदित्य एल-1 चे तिसरे अर्थ-बाऊंड ऑर्बिट मॅन्यूव्हर यशस्वी!

आदित्य एल-1 चे तिसरे अर्थ-बाऊंड ऑर्बिट मॅन्यूव्हर यशस्वी!

124

१० सप्टेंबर वार्ता: आदित्य एल-1 बाबत इस्रोने ट्विटवर पोस्ट करत माहिती दिली आहे. आदित्य एल-1 चे तिसरे अर्थ-बाऊंड ऑर्बिट मॅन्यूव्हर यशस्वीपणे पार पडलं आहे. यानंतर हा उपग्रह पृथ्वीच्या तिसऱ्या कक्षेत पोहोचला आहे. ऑर्बिट मॅन्यूव्हर प्रक्रियेच्या माध्यमातून एखादा उपग्रह आपली कक्षा बदलतो. आदित्यलाही आधीच्या कक्षेतून वरच्या कक्षेत पाठवण्यात यश मिळालं आहे. इस्रोच्या बंगळुरू येथील केंद्रावरुन ही प्रक्रिया पार पडली. सध्या हा उपग्रह 296×71,767 किलोमीटर या कक्षेत पोहोचला आहे. यापुढील ऑर्बिट मॅन्यूव्हर हे 15 सप्टेंबर 2023 रोजी पहाटे दोन वाजता पार पडेल.