Home स्टोरी आदर्श गाव गोळवण येथे सभामंडप कामाचा शुभारंभ

आदर्श गाव गोळवण येथे सभामंडप कामाचा शुभारंभ

162

आदर्श गाव योजने मधील प्रेरक अनुदानातून होणार बांधकाम: सरपंच सुभाष लाड

मसुरे प्रतिनिधी:

 

ग्रामपंचायत गोळवण-कुमामे-डिकवल या आदर्श गाव योजने मधील प्रेरक अनुदानातून ग्रामपंचायत गोळवण-कुमामे-डिकवल कार्यालयासमोर सभामंडप बांधणे या कामाचा शुभारंभ पंचायत समिती मालवण चे गटविकास अधिकारी उच्च स्तर वर्ग-1 श्री. आपासाहेब गुजर , तालुका कृषि अधिकारी श्री. विश्वनाथ गोसावी, आदर्श गाव संस्था अध्यक्ष श्री. मंगेश सावंत यांच्या उपस्थितीत झाले.

सदर काम हे आदर्श गाव योजने अंतर्गत पहिलेच मंजूर काम असून कामाची अंदाजपत्रकिय रक्कम ९ लाख २५ हजार तर श्रमदान रक्कम २ लाख ३१ हजार एवढी आहे. सदर कार्यक्रमास सरपंच सुभाष लाड, कृषि पर्यवेक्षक श्री. सावंत , ग्रा. पं. सदस्य श्री. शरद मांजरेकर, सौ. प्राजक्ता चिरमुले, सौ. मेघा गावडे, श्रीम. एकादशी गावडे, ग्रामसेविका श्रीम. अर्पिता शेलटकर, गाव गोळवण, कुमामे, डिकवल येथील ग्रामस्थ श्री. नंदादीप नाईक, श्री. नारायण परब, श्री. प्रल्हाद नाईक, श्री. विठ्ठल तळवडेकर, श्री. प्रकाश चिरमुले, श्री. बाबुराव चिरमुले, श्री. कुसाजी तेजम, श्री. सुहास घाडी, श्री. सत्यवान चव्हाण, श्री. मिलिंद पवार, सौ. प्रज्ञा चव्हाण, श्री. दाजी पाताडे, श्री. संजय पाताडे, श्री. जनार्दन गावडे, श्री. गजानन गावडे, श्री. श्रीकृष्ण तेली, श्री. नामदेव कुमामेकर, तसेच गावातील शाळेचे मुख्याध्यापक, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, कामाचे मक्तेदार श्री. विजय पालव, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच गावातील सुमारे १०० ग्रामस्थ उपस्थित होते.