संपादकीय: सध्या अनेक टुरिझम कंपन्या आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय सहली राबवून भरपूर पैसे कमवत आहेत. टुरिझम कंपन्यांचा व्यवसाय सध्या खूपच जोरात चाललेला आहे असे दिसून येते. या टुरिझम कंपन्या देश विदेशातील यात्रेबरोबरच धार्मिक यात्रांचे आयोजन करतात. सध्याच्या परिस्थितीत अनेक टुरिझम कंपन्या देशात आणि महाराष्ट्र राज्यात सुरू आहेत. त्यामुळे साहजिकच कंपन्यांमध्ये आपापसात कॉम्पिटिशन वाढले असल्याचे दिसून येते. याच कॉम्पिटिशनमुळे ग्राहक आपल्याकडे यावे यासाठी टुरिझम कंपन्यांचे मालक वेगवेगळ्या स्किम ग्राहकांना देत असतात. वेगवेगळी पॅकेजे ग्राहकांसाठी टुरिझम कंपनीने उपलब्ध करून दिलेली आहेत. मात्र आता टुरिझम कंपन्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी काही टुरिझम कंपन्यांचे मालक हिंदू धर्मासाठी लाजस्पद आणि विपरीत अशा गोष्टी करताना दिसत आहेत.
आत्ताच एक तीर्थ यात्रेची सहल एका टुरिझम कंपनीने राबवलेली असून त्या कंपनीमध्ये कदाचित फक्त आणि फक्त ग्राहकांना आकर्षित करून जास्तच जास्त पैसे कमावण्यासाठी आणि ग्राहक आपल्या हाताशी धरण्यासाठी आणि आपला व्यवसाय जास्तच जास्त वाढवून नफा मिळवण्यासाठी चक्क तीर्थयात्रेला जाणाऱ्या ग्राहकांसाठी अप्सरा आली या गाण्यावर नृत्य करणारी मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिचे नृत्य आयोजित करून तशी त्याची जाहिरात केल्याचे निदर्शनास येत आहे. मात्र यासाठी अनेक धार्मिक संघटना कडून विरोध होत असल्याची आणि याबाबत चर्चा होत असल्याची माहिती महाराष्ट्र न्यूज नेटवर्कला काही व्यक्तींनी दिली आहे.
जर खरोखरच अशा घटना घडत असतील तर ते हिंदू धर्मासाठी लाजस्पद आहे. तसेच आजही हिंदू धर्मासाठी, सनातन धर्माच्या माध्यमातून अनेक मोठमोठे गुरु कार्यरत असताना अशा तीर्थयात्रेमध्ये अप्सरांना नाचवणं हे कितपत योग्य आहे? असा प्रश्नही उपस्थित होत आहे. तीर्थयात्रेचे आयोजन केले असता ज्या ठिकाणी तीर्थयात्रेला लोक जाणार आहेत त्या ठिकाणी भजन, कीर्तन, देवाचे नामस्मरण होणे गरजेचे आहे पण तसं न होता फक्त आणि फक्त स्वतःचा व्यवसाय वाढावा यासाठी अभिनेत्रीचे नृत्य वगैरे अशा लाजास्पद उपक्रमांचा उपक्रमांचे आयोजन काही कंपन्या करत आहेत. याकडे आता हिंदू धर्मातील प्रमुख गुरु, सनातनचे प्रमुख कोणत्या प्रकारे लक्ष देतील? काय कारवाई करतील? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
हिंदू धर्मातील काही व्यक्तींच्या म्हणण्यानुसार ज्या ज्या सिने अभिनेत्रीनी मराठी किंवा हिंदी चित्रपटांमध्ये अश्लील डायलॉग वापरलेले आहेत. तसेच अश्लील कपडे घालून शरीर प्रदर्शन केलेले आहे. त्या अभिनेत्रींना धार्मिक कार्यक्रमात बोलावून त्यांच्या कार्यक्रमांचे आयोजन करून त्यांना लाखो रुपये देण्याचे काम करू नये असे म्हणणे आहे. काही अभिनेत्री तर फक्त आणि फक्त पैशांसाठी कोणत्याही चित्रपटात कशाही पद्धतीने डायलॉग बोलत आहेत आणि कसेही कपडे घालत आहेत. असे दिसून येत आहे. मग ह्या अभिनेत्री आपल्या हिंदू धर्मातील मुलींना कोणता आदर्श देत आहेत? किंवा कोणते नियम घालून देतात? याबाबत हिंदू धर्मातील गुरुंनी तसेच सनातन च्या गुरूंनी योग्य तो विचार करणं खूप महत्त्वाचे आहे.