सिंधुदुर्ग: आमदार वैभव नाईक यांनी अर्थसंकल्प (बजेट) २०२२ अंतर्गत आडेली झाराप साळगाव माणगाव (इतर जिल्हा मार्ग ५३ ) रस्ता डांबरीकरण करणे या कामासाठी ४७ लाख रु.मंजूर केले आहेत. या कामाचे भूमिपूजन आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. माणगावातील ग्रामस्थ आ. वैभव नाईक यांच्या कायम पाठीशी राहिले असून ग्रामस्थांची रस्त्याची मागणी आ. वैभव नाईक यांनी पूर्ण केली आहे.त्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले.
यावेळी शिवसेना कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे, उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी, माजी जि. प.सदस्य राजू कवीटकर,युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी, माणगाव विभागप्रमुख बंड्या कुडतरकर, विभाग संघटक कौशल जोशी, रामभाऊ धुरी, रमाकांत तामाणेकर,अजित करमलकर, माणगाव सरपंच मनीषा भोसले,उपसरपंच बापू बागवे, एसटी कामगार सेना जिल्हाप्रमुख अनुप नाईक, बंटी भिसे, अवधूत गायचोर, संदीप सावंत, सचिन भिसे, गुरुनाथ माणगावकर, राजू तामाणेकर, शैलेश विर्नोडकर, सुनील सावंत, साई नार्वेकर, दाजी पडकील, बापटो घाडी, साळगाव मधील उपविभाग प्रमुख दत्ता लाड, शाखाप्रमुख नामदेव तावडे ग्रामपंचायत सदस्या तृप्ती सावंत, एसटी कामगार सेना तालुकाप्रमुख बंड्या कोरगावकर, कु. सिद्धि मेस्त्री, युवासेना शाखा प्रमुख चेतन सावंत, दिलिप माळकर, धुरी गुरूजी आदी शिवसैनिक उपस्थित होते.