Home स्टोरी आडवली मालडी ग्रामपंचायत वेबसाईट लोकार्पण सोहळा २९ ऑगस्ट रोजी!

आडवली मालडी ग्रामपंचायत वेबसाईट लोकार्पण सोहळा २९ ऑगस्ट रोजी!

185

मालवण (मसुरे) प्रतिनिधी:

 

ग्रामपंचायतीच्या विविध शासकीय योजना, विविध दाखले, कर वसुली, ग्रामपंचायत मार्फत राबविले जाणारे सामाजिक सांस्कृतिक व लोकाभिमुख कार्यक्रम, उपक्रम याची सर्वांना माहिती व्हावी या करिता मालवण तालुक्यातील प्रथम ग्रामपंचायत ठरलेल्या आडवली मालडीचा वेबसाईट लोकार्पण सोहळा व विकासकामे भूमिपूजन कार्यक्रम

२९ ऑगस्ट रोजी सकाळी ठीक १०.०० वाजता ग्रामपंचायत कार्यालय आडवली मालडी येथे आयोजित करण्यात आला आहे. वेबसाइट चालू करणारी आडवली मालडी ही मालवण तालुक्यातुन प्रथम ग्रामपंचायत ठरली आहे. मालवण पंचायत समिती गटविकास अधिकारी

श्री. आपासाहेब गुजर, व समाजसेवक श्री. अरुण अनंत लाड यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर कार्यक्रम होणार आहे. ग्रामस्थांनी उपस्थितीचे आवाहन आडवली मालडी सरपंच संदीप आडवलकर, उपसरपंच सोनाली पराडकर, ग्रामसेवक युवराज चव्हाण यांनी केले आहे.