Home स्टोरी आज बुधवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र गौरी गणपती उत्सव उत्साहात साजरा.

आज बुधवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र गौरी गणपती उत्सव उत्साहात साजरा.

119

सावंतवाडी प्रतिनिधी: गौरी गणपती सण हा खरंतर कोकणातील सर्वात महत्त्वाचा सण मानला जातो. सुहासिनींच्या दृष्टीने प्रतिव्यतेचा प्रतीक असलेला हा सण आहे. आज बुधवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र गौरी गणपती उत्सव साजरा करण्यात आला. गौरीचे पूजन करून सुहासिनी महिलांना पुरुषांनी गौरीच्या सुहासिनी असं म्हणत हौसा प्रदान केला. सावंतवाडी तालुक्यात सह्याद्रीच्या पट्ट्यात सुहासिनीने गावातील ग्रामदैवत मंदिरात जाऊन हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला. सांगेली सावरवाड येथील एकत्रित येत अनेक महिलांनी गौरी गणपती उत्सव उत्साहात साजरा केला.