Home स्टोरी आज नेमळेत आमनेसामने २०× २० फुगडीचा जंगी सामना.! नेमळे भजन प्रेमी कला...

आज नेमळेत आमनेसामने २०× २० फुगडीचा जंगी सामना.! नेमळे भजन प्रेमी कला व क्रीडा मंडळाचे आयोजन.

221

सावंतवाडी प्रतिनिधी: नेमळे भजन प्रेमी कला व क्रीडा मंडळाच्यावतीने शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त नेमळे श्री देवी सातेरी मंदिरात रविवार २८ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजता आमनेसामने २०× २० फुगडीच्या जंगी सामन्याचे आयोजित करण्यात आले आहे.

आमनेसामने २०× २० फुगडीचा हा जंगी सामना श्री तारा देवी फुगडी मंडळ (केळुस) आणि गवळदेव फुगडी मंडळ (बोर्डवे – कणकवली) यांच्यात होणार आहे. या कार्यक्रमाचे निवेदक लखन आडेलकर (माडखोल) हे आहेत. या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन नेमळे भजन प्रेमी कला व क्रीडा मंडळाने केले आहे.