Home स्टोरी आज इतिहास घडताना डोळ्यांनी पाहिला! पंतप्रधान नरेंद्र मोदी

आज इतिहास घडताना डोळ्यांनी पाहिला! पंतप्रधान नरेंद्र मोदी

208

२३ ऑगस्ट वार्ता:  चांद्रयान-३ मोहीम यशस्वी करून भारताने जगात मोठा इतिहास रचला आहे. या ऐतिहासिक क्षणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोच्या टीम, वैज्ञानिकांचं अभिनंदन केलं. तसेच ‘इतिहास घडताना डोळ्यांनी पाहिला,अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘आज इतिहास घडताना डोळ्यांनी पाहिला. ऐतिहासिक क्षण पाहून धन्य झालो. हा क्षण अविस्मरणीय क्षण आहे. हा क्षण विकसित भारताच्या शंखनादाचा आहे. हा क्षण नव्या भारताच्या जयघोषाचा आहे. हा क्षण १४० कोटी भारतीयांच्या आशेचा आहे. यामुळे नव्या चेतना आणि उर्जेचा आहे. हा क्षण नव्या भारताचा आहे’.