Home स्टोरी आजपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात…!

आजपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात…!

107

४ डिसेंबर वार्ता: आजपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे.  आज सकाळी १०:३०  वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेच्या बाहेरून अधिवेशन सुरळीत पार पडाव यासाठी संबोधित करणार आहेत. हिवाळी अधिवेशनात आज पहिल्याच दिवशी टीएमसी खासदार महुआ मोईत्रा यांच्यावरील संसदेत प्रश्न विचारण्यासाठी लाच घेतल्याच्या आरोपाचा एथिक्स कमिटीचा रिपोर्ट अध्यक्षांसमोर सादर केला जाणार आहे.  संसदेच्या १९ दिवसांच्या या अधिवेशनात १५ बैठका होणार असून ३७ विधेयके मांडली जाणार आहेत. IPC, CRPC आणि एविडेंस अॅक्ट यात बदल करणारी तीन विधेयक अधिवेशनात पारीत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.