Home स्टोरी आजच्या दिवसाची सुरुवात चांगल्या विचारानी! जय जय रघुवीर समर्थ! श्लोक क्रमांक ४...

आजच्या दिवसाची सुरुवात चांगल्या विचारानी! जय जय रघुवीर समर्थ! श्लोक क्रमांक ४ आणि अर्थ….

117

मना वासना दुष्ट कामा न ये रे!

मना सर्वथा पापबुद्धी नको रे!

मना सर्वथा नीती सोडू नको हो!

मना अंतरी सार वीचार राहो ||४||

अर्थ: हे मना, पापवासना काही कामाची नाही. निव्वळ पापबुद्धी मनात बाळगू नये. आणि नीतिमत्ता सोडू नये. सारासार विचार मनात नेहमी असायला हवा.हे मानवा, मनामध्ये दुष्ट वासना ठेवून कधी काही भले होत नाही. तेव्हा अशी वासना, दुसऱ्याचे वाईट व्हावे अशी पापबुद्धी ठेवणे योग्य नाही. हेवेदावे मनात जोपासणे, दुसऱ्याच्या मालकीची वस्तू आपल्याला मिळावी अशी पापवासना बाळगणे दुष्टपणाचे आहे. म्हणून तू तशी वासना ठेवू नको . आपली नीतिमत्ता महत्वाची आहे. ती कधीही सोडू नये आणि सारासार विचार काय चांगले म्हणून अंगिकारावे, काय वाईट म्हणून सोडून द्यावे याचा विचार कायम मनात रहायला हवा.