Home स्टोरी आजचा युवक चुकीच्या मार्गाला जात आहे ?

आजचा युवक चुकीच्या मार्गाला जात आहे ?

205

सिंधुदुर्ग: आई-वडिलांकडून मुलांचे लाड व त्यांच्या सुरुवातीपासूनच पूर्ण होत असलेल्या अनावश्यक गरजा जेव्हा अचानक बंद होतात त्यावेळी अशी मुलं त्या गरजा पूर्ण करण्यासाठी चुकीचं पाऊल उचलतात. अशावेळी पालकांनी दुर्लक्ष केल्यास त्याचा विपरीत परिणाम त्यांच्या जीवनावर होऊ शकतो म्हणूनच या गोष्टींवर दुर्लक्ष न करता पालकांनी आपल्या मुलांच्या कुठच्या व कशा प्रकारच्या गरजा पूर्ण केल्या पाहिजेत याचा हि अभ्यास करणे गरजेचे आहे.आपली मुलं घरातून बाहेर निघल्यानंतर ती नक्कीच शाळा- कॉलेजमध्ये जातात की नाही यासाठी पण पालकांनी शिक्षकांच्या अधून मधून संपर्कात राहणे गरजेचे आहे. आपल्याला विश्वास बसणार नाही पण हि सत्य परिस्थिती आहे. काही नववी- दहावीची त्याचबरोबर कॉलेजची मुलं-मुली नको त्या अशा वाईट गोष्टींमध्ये अडकलेली आहेत. ज्याची आपण कल्पना देखील करू शकत नाही. मग याला जबाबदार नक्की कोण पालक की शिक्षक हा एक प्रश्न समोर उभा राहतो. म्हणूनच पालकांना एक विनंती करतो, वेळीच आपल्या मुलांकडे काळजीपूर्वक व गांभीर्याने लक्ष द्या अन्यथा याचा वाईट परिणाम त्यांच्या भविष्यावरच नव्हे तर त्यांच्या आयुष्यावरही होऊ शकतो. कारण काही मुलं- मुली आम्ही नेहमीच जवळून पाहतो रस्त्याने चालतांना मित्र-मैत्रिणींशी उद्धटपणे बोलणे, उद्घाटपणे वागणे, तोंडामध्ये एकमेकांबद्दल तसेच शिक्षकांबद्दलही शिव्याशाप आणि डोळ्यांमध्ये एक वेगळीच नशा हे चित्र पाहून फार वाईट वाटतं मग सांगा संस्कार, शिक्षण आणि करियरच पुढे काय? याही गोष्टींकडे लक्ष द्या आपली मुलं आपल्याला अंधारात ठेवण्याचा प्रयत्न तर करत नाही ना ? शाळा- कॉलेजमध्ये जातो असे सांगून मुलं भलतीच कडे जात आहे आणि नको त्या भानगडी करून स्वतःच आयुष्य आणि भविष्य देखील बरबाद करण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणून परत परत सांगतो शक्य होईल तेवढ पालकांनी शिक्षकांच्या संपर्कात राहावे व आपल्या मुलांना चुकीच्या किंवा वाममार्गावर जाण्यापासून रोखावे धन्यवाद.

श्री रवी जाधव सामाजिक बांधिलकी सावंतवाडी