आजगाव: सिंधुदुर्ग जिल्हा हा श्रीमंत जिल्हा आहे. या जिल्ह्याची गावागावातील अर्थव्यवस्था बदलण्याची ताकद सहकारी सेवा सोसायटीमध्ये आहे. आजगाव विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी गेली ७५ वर्ष कार्यरत आहे. या सहकारी विकास सोसायटी चा आदर्श घेण्यासारखा आहे. पर्यटन जिल्ह्यात गावागावात आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन विकास साधण्याच्या दृष्टीने पंचतारांकित हॉटेल पेक्षाही प्रत्येक गावात आदर्श पर्यटन घरकुल योजना राबवली जाईल. गावच्या सहकारी सेवा सोसायटी च्या माध्यमातून गावच्या विकासाला चालना देणारे प्रकल्प राबवावेत असे. सिंधू रत्न योजनेचे अध्यक्ष तथा आमदार दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले. आजगाव येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी आपले सरकार सेवा केंद्राचे उद्घाटन श्री केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी त्यांनी आजगाव सहकारी सेवा सोसायटीचा उत्तम कारभार सुरू आहे. या सोसायटीचे चेअरमन एकनाथ नारोजी आणि त्यांची टीम आदर्श व तशी काम करत आहे. या सोसायटीचा आदर्श इतर गावांनी घ्यावा. असेही गौरव उद्गार त्याने काढले. सिंधू रत्न योजनेतून कोकणचा पर्यटन विकास निश्चितपणे साधला जाईल. गावागावातील सहकारी सेवा सोसायटीच्या माध्यमातून विविध प्रकल्प राबवले जातील असेही ते म्हणाले.
आजगाव विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीमध्ये आज पासून आपले सरकार सेवा केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. या सोसायटीमध्ये आता सर्व शासनाच्या योजना शेतकऱ्यांच्या हिता वह राबवल्या जातील. या दृष्टीने हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे आमदार दीपक केसरकर, जिल्हा बँकेचे चेअरमन मनीष दळवी, प्रांतधिकारी हेमंत निकम, आजगाव सहकारी सेवा सोसायटीचे चेअरमन एकनाथ नारोजी, व्हाईस चेअरमन सदानंद गवस, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन प्रमोद गावडे, जिल्हा बँकेचे संचालक विद्याधर परब, उद्योजक सोमकांत नोणस्कर, माझी पंचायत समिती सदस्य बाळा शिरसाट, वासुदेव उर्फ दादा प्रभू आजगावकर, एडवोकेट स्वप्निल प्रभू आजगावकर, श्रीराम प्रभू राळकर, अमित प्रभू सुशील कामटेकर, रामचंद्र गवस, वैष्णवी नारोजी आजगाव, सरपंच सौ यशश्री सौदागर, भोमवाडी सरपंच अनुराधा वराडकर, धाकोरे सरपंच स्नेहा मुळीक, तिरोडा सरपंच संदेश केरकर, उपसरपंच श्री मठकर, संचालक सुरेश शेट्ये, अर्जुन पालव, लाडोजी नाईक, जगन्नाथ परब, दिपक बाळे, गुंडू गोडकर, विश्वनाथ आडारकर, सुरज केदार, प्रतीक्षा पांढरे, गौरवी मसुरकर, गंगाराम शेळके, आधी उपस्थित होते.
यावेळी आपले सरकार सेवा केंद्राचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले. संस्थेला ७५ वर्ष पूर्ण झाल्यावर अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने आजगाव तिरोडा भोम, नानोस या गावातील प्रगतिशील शेतकरी तसेच यशस्वी विद्यार्थी, संस्थेचे माजी चेअरमन, संचालक आदींचा सन्मान करण्यात आला. तर प्रगतशील शेतकरी यांचा घोंगडी देऊन गौरव सन्मान करण्यात आला.