Home स्टोरी आजगांव मध्ये उद्या श्री राधाकृष्ण संगीत साधना शिष्यपरिवार आयोजित ‘गुरूवंदना सोहळा’!

आजगांव मध्ये उद्या श्री राधाकृष्ण संगीत साधना शिष्यपरिवार आयोजित ‘गुरूवंदना सोहळा’!

151

सिंधुदुर्ग: संगीत अलंकार सौ. वीणा हेमंत दळवी संचलित श्री राधाकृष्ण संगीत साधना सिंधुदुर्ग शिष्य परिवाराच्या वतीने ‘गुरूवंदना संगीत सोहळा २०२३’ उद्या शनिवार दि. ०५ ऑगस्ट २०२३ दु. ठिक ३.०० वा श्री देव वेतोबा मंदिर सभागृह आजगांव ता सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आला आहे. सावंतवाडी संस्धानचे युवराज श्री लखमराजे भोसले कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित रहाणार आहेत.

गोवा येथील संगीतज्ञ ज्येष्ठ संवादिनी वादक श्री राया कोरगावकर सर, ज्येष्ठ कीर्तनकार गायक प्रा. डॉ. श्रीराम दीक्षित सर, सिंधुदुर्ग भजन संघटनेचे अध्यक्ष भजनरत्न श्री भालचंद्र केळुसकर बुवा तसेच संगीत क्षेत्रात कार्यरत अनेक मान्यवर मंडळींची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तरी सर्व संगीत प्रेमी मंडळीनी उपस्थित रहावे असे आवाहन श्री राधाकृष्ण संगीत साधना शिष्य परिवाराच्या वतीने करण्यात येत आहे.