सावंतवाडी: तालुक्यातील आजगांव येथील श्री देव वेतोबा देवस्थान व ग्रामस्थांच्या वतीने सोमवारी श्री रामलल्ला यांच्या प्राण – प्रतिष्ठा दिनानिमित्त वेतोबा मंदिरात दुपारी होम हवन, धार्मिक कार्यक्रम व महाप्रसाद तसेच सायंकाळी दीपोत्सव साजरा करण्यात आला.
तसेच ज्येष्ठ नागरीक व सेवानिवृत्त शिक्षक वसंत कृष्णाजी आपटे ज्यांनी 6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मस्जिदचा ढाचा पाडण्यात आला, त्यावेळी स्वतः त्या मोहीमेत सहभागी झाले होते. त्यांचा शाल, श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी आजगांव सरपंच सौ. सौदागर, सामाजिक कार्यकर्ते व माजी सरपंच रामचंद्र उर्फ अण्णा झान्ट्ये, तसेच देवस्थान समितीचे सदस्य व ग्रामस्थ आदी उपस्थित होते.