Home स्टोरी आजगांव ते तिरोडा मार्गे ते शिरोडा कडे जाणा-या रस्त्याचे दुरुस्ती व साकव...

आजगांव ते तिरोडा मार्गे ते शिरोडा कडे जाणा-या रस्त्याचे दुरुस्ती व साकव दुरुस्ती तात्काळ करा!

150

शिरोडा प्रतिनिधी:(दिनेश शांताराम मयेकर): आजगांव ते तिरोडा मार्गे ते शिरोडा कडे जाणा-या रस्त्यावरून तिरोडा, नाणोस, गुळदुवे आजगांव ( हरिजनवाडी ) , आरोंदा व पंचक्रोशीतील जनतेची ये-जा असते.शिरोड्याला ( ता.वेंगुर्ला ) मोठी बाजारपेठ असल्याने वरील सर्व गावांतील जनता बाजारहाट करण्यासाठी या रस्त्यावरून जात असतात.सदर रस्ता व साकव ( पूल ) पूर्णपणे नादुरूस्त असून जाणे-येणे मुश्कील झाले आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या रस्त्यावरून शाळेत जाणारी मुले व जनता चालत, सायकलने जात असतात. अशावेळी अनंत अडचणी निर्माण होतात. पावसाळ्यात रस्त्यावर खड्ड्यात पाणी साचल्याने चालत जाणा-यांच्या अंगावर पाणी उडते. शिरोडा शाळेत जाणारी पाचवीपासून – बारावी पर्यतची सर्व मुले याच रस्त्याने जातात. जात असताना सायकलवरून पडलेल्यांची अनेक उदाहरणे आहेत. सदर रस्ता व साकव (पूल) येत्या ८-१० दिवसांत दुरूस्त न झाल्यास तिरोडा , नाणोस , गुळदुवे , आजगांव (हरिजनवाडी) येथील गावांतील जनतेमार्फत ” रस्ता रोको आंदोलन ” केले जाईल. असा इशारा येथील सामाजिक कार्यकर्ते दिनेश शांताराम मयेकर यांनी दिला आहे.