सावंतवाडी: मराठा समाजातील दहावी बारावीच्या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा रविवार दिनांक ९ जून रोजी यशवंतराव भोसले इंटर नॅशनल स्कूल च्या सभागृहात शिल्पग्राम शेजारी महादेव भाटले सावंतवाडी येथे, सायंकाळी ठीक ४ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार डॉक्टर निलेश राणे, संस्थानचे लखम राजे भोसले,”भोसले नाॅलेज सीटी चे संस्थापक अध्यक्ष अच्यूतजी भोसले, युवा नेते उद्योजक विशाल परब , *प्रांताधिकारी हेमंत निकम उपस्थित राहणार आहेत.
शाल श्रीफळ सन्मान पत्र व सन्मानचिन्ह देऊन या गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात येणार आहे, मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांच्या पाठीवर पडलेली ही कौतुकाची थाप त्यांना पुढील वाटचालीस प्रेरणा देणारी ठरणार आहे,तरी सकल मराठा समाजाचे एक घटक व आमचे शुभचिंतक म्हणून या सोहळ्याला आपण अगत्यपूर्व उपस्थित राहावे ही नम्र विनंती.
आपला नम्र- सिताराम गावडे, अध्यक्ष सकल मराठा समाज सावंतवाडी व संपूर्ण कार्यकारिणी सदस्य.