Home क्राईम आंबोली वनक्षेत्रपाल प्रमिला शिंदे यांनी चौकूळ शिकार प्रकरणात केलेला तपास पूर्णतः योग्य...

आंबोली वनक्षेत्रपाल प्रमिला शिंदे यांनी चौकूळ शिकार प्रकरणात केलेला तपास पूर्णतः योग्य नाहीच.

125

सावंतवाडी प्रतिनिधी: आंबोली वनक्षेत्रपाल प्रमिला शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाचे कर्मचारी गुरुवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास चौकुळ केगदवाडी रस्त्यावर दोन व्यक्ती संशयास्पद रित्या फिरताना आढळले. वन कर्मचाऱ्यांनी त्यांना थांबवून त्यांची कसून तपासणी केली असता, त्यांच्याकडे एक सिंगल नळीची बंदूक, चार जिवंत काडतुसे आणि एक मृत पिसव आढळून आला. यासोबतच त्यांच्या ताब्यातील दोन मोबाईल आणि एक टीव्हीएस कंपनीची नंबर प्लेट नसलेली स्कूटर  जप्त केली. तुषार विजय गुंजाळ (वय ३८, रा. ऊपवडे, ता. कुडाळ) आणि परशुराम संजय राऊळ (वय २७, रा. देऊळवाडी, मळगाव, ता. सावंतवाडी) अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. या दोन्ही आरोपींविरोधात वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ (सुधारित २०२३) चे कलम ९, ३९, ५१ आणि ५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सापडलेली अवैध बंदूक

मात्र एक सिंगल नळीची अवैध बंदूक, चार जिवंत काडतुसे सापडली असूनही १९५९ (Arms Act, 1959) नुसार जे गुन्हे लावले पाहिजेत ते गुन्हे न लावाल्याची धक्कादायक माहिती. मिळत आहे. त्यामुळे वनपाल प्रमिला शिंदे यांचा बेजबाबदारपणा या ठिकाणी स्पष्ट दिसून येत आहे. वनपाल प्रमिला शिंदे यांनी एक सिंगल नळीची अवैध बंदूक, चार जिवंत काडतुसे सापडली याबाबत पोलिसांना माहिती देऊन Arms Act, 1959 नुसार कारवाई करणे गरजेचे होते. पण तसं काही करण्यात आलं नाही. त्यामुळे वनपाल प्रमिला शिंदे यांनी कर्तव्य न बजावल्याने त्यांच्यावर शिस्तभंग कारवाई होणे गरजेचे आहे. तसेच तुषार विजय गुंजाळ (वय ३८, रा. ऊपवडे, ता. कुडाळ) आणि परशुराम संजय राऊळ (वय २७, रा. देऊळवाडी, मळगाव, ता. सावंतवाडी) अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींना अटक करून Arms Act, 1959 नुसार पोलिसांनी योग्य ती कारवाई करणे गरजेचे आहे.

अवैध बंदूक, चार जिवंत काडतुसे सापडली असता १९५९ (Arms Act, 1959) नुसार लागू होतो, विशेषतः कलम ३, २५, आणि २७ अंतर्गत कारवाई होते, ज्यात परवान्याशिवाय शस्त्र बाळगणे किंवा वापरणे गुन्हा आहे. ज्यासाठी शिक्षा आणि दंड होऊ शकतो. यासाठी शिक्षेमध्ये कठोर कारावास आणि दंड (३ ते ७ वर्षांपर्यंत किंवा त्याहून अधिक) होऊ शकतो. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यास कठोर शिक्षेची तरतूद आहे आणि अशा गुन्ह्यांमध्ये जामीन मिळणेही कठीण असते. असं असतांना तुषार विजय गुंजाळ (वय ३८, रा. ऊपवडे, ता. कुडाळ) आणि परशुराम संजय राऊळ (वय २७, रा. देऊळवाडी, मळगाव, ता. सावंतवाडी) अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची लगेच दुसऱ्या दिवशी जामीनावर सुटका होते. त्यामुळे कायद्याचे रक्षक नक्की काय करतायत? असा प्रश्न उपस्थित होतो.