सावंतवाडी: तालुक्यातील आंबोली हिरण्यकेशी येथे शासकीय आणि अनिर्णित वनक्षेत्र जमिनीत अनधिकृत २७ बंगले, हॉटेल इमारत बांधकाम सुरू असताना महसूल आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने स्थानिक भूमिपुत्रावर अन्याय होत आहे. महसूल, वनविभाग आणि वीज मंडळाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या सेकंड लवासा प्रकरणी आठवडाभरात हातोडा मारावा अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भूमिपुत्र आंदोलन छेडतील असा इशारा उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी दिला.
या अनाधिकृत बांधकामाविरोधात स्थानिक महिलांसह माजी सैनिक मागील दहा दिवस साखळी उपोषण छेडत आहे. थंडी, वारा आणि उन सुमारे २०० लोक दैनंदिनी साखळी उपोषण करत आहे या ठिकाणी खासदार विनायक राऊत यांनी अधिकाऱ्यांसह दुसऱ्यांदा भेट दिली. खासदार विनायक राऊत यांनी शासकीय व वन क्षेत्र अनिर्णित जमिनीच्या ठिकाणी बांधलेल्या बंगल्यांची पाहणी केली तसेच अनधिकृत असणाऱ्या एका शेडला वीज मंडळाने मीटरदेत वीजपुरवठा केला आहे यावेळी अधिकाऱ्यांना छेडले. महसूल व वनविभागाने हे क्षेत्र मोजणी केले किंवा कसे? याची खात्री केलीत्यानंतर महिलांसह बसलेल्या उपोषण स्थळी यांनी थेट अधिकारी आणि नागरिकांची चर्चा केली.
आंबोली हिरण्यकेशी मधील हा सेकंड लवासा आम्ही म्हणतो, अधिकारीआणि राजकीय लोकांच्या वरदहस्त्याने या ठिकाणी बेकायदेशीर पणे हे बंगले उभारले आहेत हे राजकीय आधार व अधिकाऱ्यांच्यासहमतीशिवाय होऊ शकत नाही असे खासदार विनायक राऊत यांनी म्हटले.