सावंतवाडी : सावंतवाडी-आंबोली घाटात अवघड वळणावर एसटी आणि कार यांच्यात समोरासमोर धडक झाली. हा अपघात आज सायंकाळच्या सुमारास घडला. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. मात्र कारच्या समोरील भागाचे किरकोळ नुकसान झाले आहे. दरम्यान अपघातानंतर दोन्ही वाहने येथील पोलीस ठाण्यात आणण्यात आली होती.याबाबत अधिक माहिती अशी की, अपघातग्रस्त एसटी बेळगावहून आंबोली मार्गे सावंतवाडीच्या दिशेने येत होती. तर अपघात ग्रस्त कार विरुद्ध दिशेने जात होती. यावेळी आंबोली घाटातील एका अवघड वळणावर दोन्ही वाहन चालकांना एकमेकांचा अंदाज न आल्याने दोन्ही वाहने एकमेकावर आढळली. यात सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. मात्र चार चाकीच्या समोरील भागाचे किरकोळ नुकसान झाले आहे. याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद नाही.