Home स्टोरी आंबोली गावात जंगली हत्तीची दहशत.

आंबोली गावात जंगली हत्तीची दहशत.

138

सावंतवाडी प्रतिनिधी: दोडामार्ग व परिसरात तसेच सह्याद्रीच्या काही भागात दिसून येणारे हत्ती आता आंबोली भागातही दाखल झाले आहेत. गेलें चार पाच दिवस आंबोली परिसरात हत्ती शेतीचे नुकसान करत आहेत. तसेच वाड्या व वस्त्यांमंध्ये व घरांशेजारी हत्ती फिरत असल्यामुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

आंबोलीतील काही भागात गेल्या काही दिवसात एक टस्कर ( हत्ती ) फिरायला असून तो भात शेती नाचणी तसेच उसाच्या शेतीची नुकसानी मोठ्या प्रमाणात करीत आहे. शेतकऱ्यांनाही त्याच्यापासून भीती निर्माण झाली आहे. आंबोली हे हत्तीचे नैसर्गिक अधिवासाचे ठिकाण नसल्यामुळे त्याला पकडून त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात यावे.

एखादा अपघात घडला तर त्याला सर्वस्वी वन विभाग जबाबदार असेल, असा इशारा स्थानिक ग्रामस्थांनी दिला आहे.

आंबोलीतील शेतकरी आधीच रानगवे (गवा रेडा ) व डुक्कर या रानटी प्राण्यांमुळे मेटाकुटीस आलेले असताना आता हत्ती मुळे जीव मुठीत धरून शेती करावी लागत आहे.गेल्या वर्षी हत्तीने केलेल्या नुकसानीचा अजून मोबदला येथील बऱ्याच शेतकऱ्यांना मिळाला नाही.

आंबोलीतील कबूलयतदार गावकर जमीन प्रश्न व वनप्रश्न अजून पूर्णपणे सुटला नसल्यामुळे येथील शेतीचे प्रमाण दिवसांगणित कमी होत आहे. आंबोली तील रानटी जनावरांमुळे येथील दूध उत्पादकांचे देखील मोठया प्रमाणात नुकसान होत आहे.

वन विभागाने या वर तात्काळ योग्य ती कार्यवाही न केल्यास येथील शेतकरी व दूध व्यावसायिक आंदोलन व प्रसंगी उपोषण करणार

त्यामुळे या टस्कराच्या बंदोबस्तासाठी वन विभागाने लवकरात लवकर योग्य ती ठोस कार्यवाही करावी, अशी मागणी आंबोली सरपंच सौ. सावित्री पालेकर यांनी केली आहे.