Home स्टोरी आंबोलीत श्री देवी माऊली गावडे वस भजन मंडळाच्या नामफलकाचे अनावरण

आंबोलीत श्री देवी माऊली गावडे वस भजन मंडळाच्या नामफलकाचे अनावरण

93

आंबोली प्रतिनिधी:  आंबोली येथील श्री देवी माऊली गावडे वस भजन सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाकडे नोंदणीकृत करण्यात आले असुन श्री देवी माऊली गावडे वस भजन या मंडळाच्या नामफलकाचे अनावरण मानकरी व सर्व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी आंबोली ग्रामदैवत माऊली देवस्थानचे प्रमुख गावकार श्रीकांत गावडे, शशिकांत गावडे, गावकार रामा रूपा गावडे, तानाजी न्हानू गावडे, देवकार रामा भिकाजी गावडे, खोत सोमा रामा गावडे तसेच श्री पारधी, श्री नाटलेकर, व ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी श्री देवी माऊली गावडे वस भजन या मंडळाचे अध्यक्ष शिवराम सोमा गावडे, उपाध्यक्ष मनोहर लक्ष्मण गावडे, सचिव दिलीप गोविंद गावडे, खजिनदार सोमा रामा गावडे, सदस्य सुधाम विठ्ठल नाटलेकर, लक्ष्मण रूपा गावडे, गणपत महादेव गावडे, रामा भिकाजी गावडे, विलास कृष्णा गावडे, ज्ञानेश्वर कृष्णा गावडे, संजय यशवंत गावडे, एकनाथ कृष्णा पारधी आदी उपस्थित होते.