Home राजकारण आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री नायडू याच्या अटके नंतर पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक!

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री नायडू याच्या अटके नंतर पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक!

63

१२ सप्टेंबर वार्ता: आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना घोटाळा प्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यांनतर पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

टीडीपीने वायएसआरसीपी सरकारविरोधात काल सोमवार दि. ११ सप्टेंबर रोजी  राज्यव्यापी बंद पुकारला होता. त्या पार्श्वभूमीवर सरकारने राज्यात फौजदारी प्रक्रिया कायद्यातील कलम १४४ लागू केले आहे आणि आंध्र प्रदेश राज्यात फौजफाटा तैनात कारण्यात आला आहे. माजी मुख्यमंत्री नायडू यांच्यावर अभूतपूर्व अशाप्रकारची कारवाई केल्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. पोलिस प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी टीडीपीच्या अनेक नेत्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. तसेच राज्यभरातील अनेक आंदोलकांना पोलिस ठाण्यात बंद केले आहे.