Home शिक्षण आंतरराष्ट्रीय रंगोत्सव कला स्पर्धेत इंग्लिश मिडीयम स्कूल तळवडेच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश…!

आंतरराष्ट्रीय रंगोत्सव कला स्पर्धेत इंग्लिश मिडीयम स्कूल तळवडेच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश…!

107

सावंतवाडी: गुरुवर्य बी. एस.नाईक मेमोरियल ट्रस्ट,सावंतवाडी संचलित इंग्लिश मिडीयम स्कूल तळवडेच्या विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय रंगोस्तव कला स्पर्धेत नेत्र दीपक यश संपादन केले आहे. सदर स्पर्धेसाठी इ. तिसरी मधील कु. अवनीश अमर गावडे याने कार्टून मेकिंग व इ . सहावी मधील अस्मित सुभाष परब याने ग्रिटींग कार्ड स्पर्धेत चषक व सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. तर इयत्ता पाचवी मधील अदिती महेश जंगम हिने कलरींग व यु.के.जी. मधील सानवी गोविंद परब हिने

हस्ताक्षर स्पर्धेत उत्तेजनार्थ क्रमांक पटकावत पारितोषिक मिळवले आहे. तसेच इतर विद्यार्थ्यांनी सुवर्ण पदकाचे कमाई करत घवघवीत यश संपादन केले. स्पर्धेसाठी कला विषय सहाय्यक शिक्षक श्रद्धा पायनाईक व वसंत सोनुर्लेकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल संचालिका मैथिली मनोज नाईक यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देवून अभिनंदन करत पुढे होणाऱ्या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्यात. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक अजय वामन बांदेकर, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते .