Home स्टोरी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने पी.एस.चोडणकर ज्वेलर्स तर्फे १६ प्रेरणादायीनींचा सन्मान.

आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने पी.एस.चोडणकर ज्वेलर्स तर्फे १६ प्रेरणादायीनींचा सन्मान.

42

सावंतवाडी प्रतिनिधी: आपला व्यवसाय छोटा असो किंवा मोठा, आणि तो कोणताही असो पण जिद्द कायम ठेवून अनेक अडचणींवर मात करून स्वतःला तसेच कुटुंबाला सावरुन, मुलांना उच्च शिक्षण देऊन सर्वार्थाने मोठं करणा-या १६ प्रेरणादायीनींचा सन्मान उत्सव आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने पी.एस.चोडणकर ज्वेलर्स (पावन श्रीपाद चोडणकर) सावंतवाडी यांच्या तर्फे सन्मानचिन्ह, शाल आणि श्रीफळ देऊन करण्यात आला.

ह्या सर्व महिला घरकाम, डबे देणे, शिवणकाम करणे,पापड लोणची चटण्या तयार करून घरपोच देणे, असे विविध व्यवसाय करतात. कोणाला पती नाही. कोणाचे पती अपंग तर कोणी कुटुंबाला आधार देण्यासाठी कष्टाने आणि नेटाने हे करतात.

पी.एस.चोडणकर यांची गेल्या ७० पेक्षा जास्त वर्षांपासून सावंतवाडी येथे ग्राहकांच्या तीन पिढ्यांशी भावनिक तसेच व्यावसायिक नातेसंबंध जपत सराफी व्यवसाय करत आहेत.सर्व प्रकारच्या पारंपरिक तसेच डिझाईनर सोन्याचांदीच्या दागिन्यांचे खरेदी विक्रीचे व्यवहार सचोटी आणि पारदर्शकतेने सांभाळून ग्राहकांचा विश्वास संपादन करून चोडणकर कुटुंबाची तिसरी पिढी हा व्यवसाय पुढे नेते आहे. ह्या कार्यक्रमात श्री. श्रीपाद चोडणकर, पावन चोडणकर आणि पी.एस.चोडणकर यांचा सर्व कर्मचारी वर्ग आणि सन्मानार्थी महिला उपस्थित होत्या.