मसुरे प्रतिनिधी:
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या व कोकणचे प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी मंदिर १९ वा सुवर्ण कलश वर्धापन दिन सोहळा १७ ते १८ नोव्हेंबर २०२३ रोजी साजरा होत आहे. त्यानिमित्त १८ रोजी रात्री १० वा. जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धा होणार आहे. प्रथम तीन क्रमांकाना अनुक्रमे ५ हजार, ३ हजार, २ हजार रुपयांचे पारितोषिक व चषक देण्यात येणार आहे. स्पर्धकांनी बाबू आंगणे (७५८८४०९५८९), दिनेश आंगणे(९४२०२०६७८२) प्रसाद आंगणे (९४०३६३९०७२) येथे संपर्क साधावा. कार्यक्रमास उपस्थिती दर्शविण्याचे आवाहन आंगणे कुटुंबियांच्या वतीने करण्यात आले आहे.