मसुरे प्रतिनिधी: (पेडणेकर): आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी मंदिर येथे १३ मे रोजी श्री सत्यनारायण पूजेनिमित्त रात्रौ ठिक १०.३० वाजताकै. मामा कोरगावकर यांच्या स्मरणार्थ जिल्हास्तरीय खुल्या एकेरी नॄत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेसाठी प्रथम चार क्रमांकाना अनुक्रमे ५५५५, ४४४४, ३३३३, २२२२ तसेच उत्तेजनार्थ अनुक्रमे ११११, ७७७, ५५५ रुपये देण्यात येतील. स्पर्धेत सहभागी होणा-या प्रत्येक स्पर्धकास सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात येईल. ११ मे २०२३ पर्यंत येणा-या स्पर्धकांची नावे विचारात घेतली जातील. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
नाव नोंदणीसाठी बाबू आंगणे संपर्क क्रमांक ७५८८४०९५८९ आणि प्रसाद आंगणे ९४०३६३९०७२ वर संपर्क साधावा.