असंख्य भाविकांचे सुलभ स्वच्छतागृहात पाणी नसल्यामुळे अतोनात हाल…! वीज वितरण चे लक्ष वेधूनही दुर्लक्ष.
मसुरे प्रतिनिधी: दक्षिण कोकणची काशी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या आंगणेवाडी श्रीदेवी भराडी मंदिर नजीक असणाऱ्या अद्यावत अशा सुलभ स्वच्छता ग्रहाला गेले चार दिवस या स्वच्छतागृहाचा वीज मीटर बंद असल्यामुळे पाणीपुरवठा होत नाही आहे. या स्वच्छता ग्रहाला होणारा वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे याबाबत येथील ग्रामस्थ अनंत आंगणे यांनी संबंधित वीज अधिकारी वर्ग आणि कर्मचारी वर्गाशी दुरध्वनीवरून संपर्क साधूनही अद्याप कोणततीच कार्यवाही झाली नसल्यामुळे येथे येणाऱ्या भाविकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. याबाबत त्वरित कार्यवाही करण्यासाठी आंगणेवाडी विकास मंडळाचे अध्यक्ष भास्कर आंगणे यांनी लेखी निवेदनाद्वारे पुन्हा एकदा लक्ष वेधले आहे.
आंगणेवाडी येथील अत्याधुनिक अशा सुलभ स्वच्छता ग्रहाला पाणीपुरवठा करणारा वीज मीटर मधून वीज प्रवाह खंडित झाल्यामुळे या स्वच्छता ग्रहाचे पाणी पूर्णतः बंद झालेले आहे. यामुळे या स्वच्छता ग्रहाचा वापर करणाऱ्या भाविकांचे तसेच विशेषता महिलांचे मोठे हाल होत आहेत. याबाबतचे वीज वितरण च्या सर्व संबंधितांचे लक्ष वेधूनही अद्याप पर्यंत या खंडित झालेल्या वीज प्रवाह बाबत दुरुस्त करण्यासाठी कोणतीच उपयोजना केली नाही. वीज वितरण चे स्थानिक कर्मचारीही याबाबत उडवा उडवी चे उत्तरे देत आहेत. आंगणेवाडी सारख्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी महत्त्वाच्या अशा वीज मीटरचा वीज प्रवाह वीज वितरण च्या तांत्रिक कारणामुळे किंवा वीज पोलावरून होणारा प्रवाह खंडित झाल्यामुळे जर या दुरुस्तीसाठी वीज वितरण ला वेळ नसेल तर सर्वसामान्य जनतेची संबंधित अशी कामे वीज वितरणचे अधिकारी कसे करणार असा संतप्त सवालही अनंत आंगणे यांनी उपस्थित केला आहे.
या प्रश्नाबाबत संबंधित विभागाने त्वरित दखल न घेतल्यास याबाबत पालकमंत्री माननीय रवींद्र चव्हाण आणि वरिष्ठ वीज अधिकारी यांच्याकडे तक्रार करणार असल्याची माहिती अनंत आंगणे यांनी दिली आहे.