Home स्टोरी आंगणेवाडी आज पाच एकांकिकांचे सादरीकरणहोणार..! आंगणेवाडी नाट्य मंडळाच्या हिरक महोत्सवानिमित्त आयोजन.

आंगणेवाडी आज पाच एकांकिकांचे सादरीकरणहोणार..! आंगणेवाडी नाट्य मंडळाच्या हिरक महोत्सवानिमित्त आयोजन.

66

मसूरे प्रतिनिधी: आंगणेवाडी नाट्य मंडळ मुंबई यांच्या हिरक महोत्सव निमित्त २८ फेब्रुवारी रोजी एकांकिका महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ७ वाजल्यापासून एकांकिका महोत्सव होणार आहे. यामध्ये कलांश थिएटर प्रस्तुत ‘क्रॅक्स इन थिएटर’, एकदम कडक नाट्यसंस्था भाईंदर प्रस्तुत ‘पाटी’, जिराफ थिएटर प्रस्तुत ‘गुडबाय किस’, कलादर्शन पुणे प्रस्तुत ‘बॉईल्ड शुद्ध शाकाहारी’, गायन समाज देवल क्लब कोल्हापूर प्रस्तुत ‘ऑलमोस्ट डेड’ या एकांकिका सादर होणार आहेत. तरी नाट्यरसिकानी उपस्थित राहावे असे आवाहन आंगणे कुटुंबीय व आंगणेवाडी नाट्यमंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.