मालवण (आंगणेवाडी): आंगणेवाडीच्या भराडीदेवीची जत्रा दरवर्षी देवीला कौल लावून ठरवली जाते. आता यंदाच्या आंगणेवाडीच्या जत्रेची तारीख जाहीर झाली आहे. यंदा ही जत्रा २२ फेब्रुवारी २०२५ रोजी होणार आहे. एका गावातील ही जत्रा असली तरीही देशा-परदेशातील भाविक आर्वजून या जत्रेसाठी कोकणात दाखल होतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील मसुरे गावात आंगणेवाडी येथे ही जत्रा संपन्न होते. भरडावर देवी प्रकट झाली म्हणून या देवीचं नाव ‘भराडी देवी’ असं ठेवण्यात आलं आहे. अशी आख्यायिका आहे.