Home स्टोरी अहिल्यानगर (नगर) येथे मिरवणुकीत धर्मांधांनी मिरवले क्रूरकर्मा औरंगजेबाचे चित्र!

अहिल्यानगर (नगर) येथे मिरवणुकीत धर्मांधांनी मिरवले क्रूरकर्मा औरंगजेबाचे चित्र!

173

नगर: येथील मुकुंदनगर परिसरात सूफी संत (सुफी हा इस्लाम धर्मातील एक संप्रदाय आहे. लोकरीची घोंगडी पांघरून स्वतःच्या विचारांचा प्रचार करणार्‍या फकिरांना सुफी म्हणतात) दमबारा हजारी यांचा दर्गा आहे. ४ जून या दिवशी या दर्ग्याचा उरुस (मुसलमान सत्पुरुषाच्या पुण्यतिथीनिमित्त होणारा उत्सव) साजरी करण्यात आली. त्या वेळी मुकुंदनगर परिसरातून चादर अर्पण करण्यासाठी मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत चक्क औरंगजेबाचे चित्र घेऊन नाचण्याचा प्रकार घडला. या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यातीले पोलीस कर्मचारी सचिन नवनाथ धोंडे यांनी तक्रार प्रविष्ट केली आहे. त्यात म्हटले आहे की, ‘फकीरवाडा परिसरात ४ जून या दिवशी दम बारा हजारी दर्ग्याजवळ निघालेल्या सदल उरुस मिरवणुकीमध्ये काही जणांनी संगनमताने औरंगजेबाची प्रतिमा असलेले फलक हातामध्ये घेत प्रदर्शन करून ‘बाप तो बाप होता है, बेटा तो बेटा होता है’ अशा घोषणा देत २ समाजांत जातीय तेढ निर्माण होईल अन् द्वेष पसरेल असे कृत्य केले आहे.’ या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी महंमद सर्फराज इब्राहिम सय्यद उपाख्य सर्फराज जहागिरदार, अफनान शेख, शेख सरवर आणि जावेद शेख यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. त्यांना कह्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. औरंगजेबाचे चित्र जर कुणी झळकवत असेल, तर हे मान्य केले जाणार नाही. या देशामध्ये, तसेच महाराष्ट्रामध्ये आमचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज असू शकतात. कुणी औरंग्याचे नाव घेत असेल, तर त्याला त्या ठिकाणी क्षमा नाही.

भाजपचे आमदार नीतेश राणे यांनीही यावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, राज्यात काही भागांत अशा प्रकारच्या जिहादी विचारांचे लोक आहेत. ते पाकिस्तानच्याही घोषणा देतात; पण त्यांनी लक्षात घ्यावे की, आता महाविकास आघाडीचे सरकार नाही. यापुढे असे प्रकार चालणार नाहीत. ते पुन्हा असे धाडस करणार नाहीत, याची काळजी आम्ही घेऊ.