Home स्टोरी असे हि समाजघातक माणूस समाजात असतात..! अखेर त्या अमानुष तानाजी कांबळे प्राध्यापकाने...

असे हि समाजघातक माणूस समाजात असतात..! अखेर त्या अमानुष तानाजी कांबळे प्राध्यापकाने त्या मागासवर्गीय कुटुंबाच्या झोपडीवर जेसीबी फिरवलाचं..! रवी जाधव.

69

सावंतवाडी प्रतिनिधी: ४ ऑगस्ट २०२५ सावंतवाडी जिमखाना मैदान नजीक मागासवर्गीय वस्तीमधील ही घटना असून सर्व स्तरावरून या दुर्दैवी घटनेची हळहळ व्यक्त केली जात आहे. शहरातील एका कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना ज्ञान-दान करणारा राजापूर येथील अमानुष तानाजी कांबळे नामक प्राध्यापक काही वर्षांपूर्वी जिमखाना मैदान येथील मागासवर्गीय वस्तीमध्ये घर बांधण्यासाठी जागेच्या शोधात आला व तेथील एका गरीब अशिक्षित कुटुंबाची जागा पाहून रवी जाधव यांना म्हणाला तू माझा विद्यार्थी आहेस तू मला ही जागा मिळून दे मी पण मागासवर्गीय आहे.

मी जर या वस्तीमध्ये आलो तर या लोकांच कल्याण केल्याशिवाय राहणार नाही त्यांना शासकीय योजनेतून घरे बांधून देईन,आपल्या गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी खर्च करेन, प्रत्येकाच्या घरात लाईटी देईन आणि गोरगरीब कुटुंबांना आर्थिक मदत देखील करेन आणि बघ त्यांच्यासाठी काय काय करतोते.

आपल्याच समाजाचा हा चांगला आणि प्रामाणिक माणूस आहे नक्कीच आपल्याला मदत करेल म्हणून प्रत्येकाने त्याच्या शब्दावर विश्वास ठेवला आणि कवडी मोलाच्या दामात दोन गुंठे जागा त्याला घर बांधण्यासाठी दिली वस्तीतील लोकांच्या अशिक्षितपणाचा फायदा घेऊन मोठा बंगला बांधला वस्तीतील लोकांशी गोड गोड बोलून सगळ्या सोयी सुविधा मिळवल्या आणि काही दिवसानंतर सर्वांशीच संबंध तोडून वस्तीतील लोकांशी कायमचा बोलायचा बंद झाला.

त्याच्या राहत्या बंगल्यासमोरच ३५ वर्ष अगोदर राहत असलेल्या एका गरीब कुटुंबाची झोपडी होती आणि तीचं झोपडी त्याच्या डोळ्यात नेहमी खुपसत असायची. एका दिवशी झोपडी असलेल्या त्या जागेच्या मालकिणीला परस्पर भेटून म्हणाला त्या झोपडीत असलेल्या कुटुंबाला मी एक छानसं घर बांधून देईन ती जागा मला दे आणि ती हि जागा अतिशय कमी दरात खरेदी करून त्या जमीन मालकिणीला मूर्ख बनवलं.

जागा खरेदी होताच त्या गरीब कुटुंबाला त्यांने इतका मानसिक त्रास द्यायला सुरुवात केली कि सर्वप्रथम त्याच्या झोपडीच्या सभोवताली सीसीटीव्ही कॅमेरे लावले त्यानंतर त्यांच्या झोपडी समोर येण्या- जाण्याच्या वाटेवर दगडाचं बांधकाम करून त्यांचा रस्ता बंद केला झोपडी काढून टाकत नाही म्हणून एका दिवशी तर त्यांच्या घरात घुसून त्यांच्या चुलीवर लाथ मारून त्यांच अन्न वाया घालवलं होतं आणि याच धक्क्याने त्या गरीब कुटुंबातील दोघी नवरा बायको जीवाला कंटाळून वयाच्या पत्नी 48 व तिचा अंध नवरा 56 व्या वर्षी एका मागून एकाने आपलं जीवन संपवलं. कारण फक्त आजारी पडून मृत्यू झाल्याच दाखवण्यात आलं. त्या अमानुष कांबळे प्राध्यापकाच्या दारासमोर दोघांचीही प्रेत होती परंतु त्या माणसाने त्या प्रेतांकडे ढुंकून सुद्धा पाहिले नाही. त्या कांबळेचे एकच स्वप्न होतं की माझ्या सुंदर बंगल्यासमोर ती झोपडी नकोच.

अशी होती गरीबाची झोपडी

परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दीनदुबळ्यांच्या न्याय हक्कासाठी लढले त्यातील हा पण एक माणूस होता. सवलतीवर शिक्षण घेऊन प्राध्यापक झाला आणि आज त्याने एक गरीब कुटुंबाची झोपडी उध्वस्त करून फार मोठा पराक्रम गाजवला. कष्टाने बांधलेली झोपडी टिकवण्यासाठी त्याच्या पश्चात वृद्ध भाऊ व त्या मृतदापत्त्यांच्या मुलीने खूप संघर्ष केला होता त्या संघर्षामध्ये रवी जाधवने त्यांना खूप साथ दिली होती पण पैशा अभावी सर्व प्रयत्न व्यर्थ ठरले.

माझ्याजवळ खूप पैसा आहे. तुमच्याकडे काय आहे, तुम्ही माझं काहीच करू शकत नाही.” असं सांगून तो ती केस जिंकला आणि शेवटी अखेर त्यांचा पश्चात असलेला वयोवृद्ध भाऊ आणि कधीतरी माहेरी येणारी त्यांची मुलगी कायमची बेघर झाली ती झालीच पण त्या झोपडीत त्या मृत दांपत्यानी जिवंत असताना रात्रंदिवस कष्ट करून थाटलेला संसार त्या अमानुष प्राध्यापकाने एका क्षणात उध्वस्त करून कचराकुंडीत फेकून दिला.

मला गरिबांच नको, मला गरिबांच नको” असं खोटं खोटं सर्वांना सांगणारा तो क्रूर कांबळे त्या गरीब कुटुंबाचा कर्दनकाळ ठरला. त्या गरिबांची झोपडी जेसीबीने उध्वस्त करण्या पूर्वी १० माणसं गावाकडून म्हणजेच राजापूर येथून आणून ठेवली होती एवढा माजलेला हा माणूस शिक्षक पेशात दडलेला गुंड असल्याच सर्वांनीच अनुभवलं.

हा माणूस खूप गोड बोलतो, मोठमोठ्या गोष्टी सांगतो कृपा करून त्याच्या गोड बोलण्यावर विश्वास ठेवू नका त्याचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आहेत. मित्रांनो मी रवी जाधव याच्या गोड बोलण्याला फसलो तुम्ही अशा प्रवृत्तीच्या माणसांकडून कधीच फसू नका तसेच आपल्या जमिनी अशा धोकेबाज आणि फसव्या माणसाला कधीच विकू नका सभ्यगिरीच ढोंग करणारी हि माणसं नंतर आपल्यालाच रस्त्यावर कधी आणतील हे सांगता येणार नाही.

हा अमानुष तानाजी कांबळे एवढा क्रूर आहे की तो सध्या राहत असलेल्या वस्तीमध्ये एखाद्या वेळी दुःखद घटना घडली तर हा माणूस दरवाजे – खिडक्या बंद करून घरात राहतो पण कोणाच्या सुख -दुःखात कधीच सहभागी होत नाही एवढेच नव्हे तर ज्यांच्यामुळे आज सर्व सोयीसुविधा व सुखाचे जीवन जगत आहे त्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीला सुद्धा हा माणूस कधीच कुठे दिसत नाही.

हा माणूस खूपचं स्वार्थी आहे फसवा आहे असो, परंतु आता त्या गरीब लाचार निराधार त्याच्या वयोवृद्ध भावाला उर्वरित जीवन रस्त्यावर जगावं लागणार आहे कारण आता त्याला कधीच न्याय मिळणार नाही हे कडू सत्य आहे परंतु हा – क्रूर प्रवृत्तीचा तानाजी कांबळे समाज आणि शिक्षक पेशाला कलंक आहे हे मात्र सिद्ध झाले आणि असा माणूस एका कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना शिकवतो,ज्ञान देतो हे त्या विद्यार्थ्यांचं दुर्दैवच म्हणावे लागेल. अशा या अमानुष आणि क्रूर तानाजी कांबळेला एक दिवस नियतीच शिक्षा देईल हे मात्र नक्कीच.

रवी जाधव – समाजसेवक सावंतवाडी,  बीए. बीएड. एम. ए. एम. फिल.

रवी जाधव – संपर्क क्रमांक – 9405264027