मसुरे प्रतिनिधी: असलदे येथील श्री स्वामी समर्थ महाराज सामाजिक सेवा ट्रस्टच्या कार्यालयाचे उदघाट्न खडवली दत्त मंदिर पुजारी संजय सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थापक अध्यक्ष, श्री सचिन लोके यांनी सर्वांचे स्वागत केले. संस्थापक सचिव श्री प्रशांत साटम, संस्थापक खजिनदार सौ.ज्योती जाधव, विश्वस्त श्री.मधुसूदन भडसाळे,श्री प्रकाश पावसकर, श्री.तात्या निकम, श्री.प्रकाश जोंईल, स्वामी भक्त महेश डगरे, रामचंद्र जेठे, गणेश लोके, मयूर जंगले, लक्ष्मण लोके, विशाल जेठे, सचिन हरमलकर, अनिल लोके, राजाराम जेठे, विजय आचरेकर, चंद्रकात जेठे, जाधव गुरुजी, गणेश मोरये, सौ. कांचन राणे आणि स्वामी भक्त उपस्थित होते. या ट्रस्टच्या माध्यमातून समाजातील गरजू, उपेक्षित लोकांच्या हिताचे काम करण्यात येणार असल्याचे अध्यक्ष सचिन लोके यावेळी म्हणाले. आभार खजिनदार सौ ज्योती जाधव यांनी मानले.







