Home शिक्षण असनिये येथील श्री शिवछत्रपती माध्यमिक विद्यालयात डिजिटल क्लासरूमचे उद्धाटन.

असनिये येथील श्री शिवछत्रपती माध्यमिक विद्यालयात डिजिटल क्लासरूमचे उद्धाटन.

67

सावंतवाडी प्रतिनिधी: असनिये येथील श्री शिवछत्रपती माध्यमिक विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधुन डिजिटल क्लासरूमचे उद्धाटन करण्यात आले. यासाठी असनिये गावचे यशवंत उर्फ भाई लाडू सावंत यांच्या प्रयत्नातुन मुंबई बदलापूर येथील एक्सेल इंडीया प्रोटेक्टीव पेंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने सुमारे १ लाख २० हजार किंमतीचा स्मार्ट बोर्ड या प्रशालेस उपलब्ध करून दिला.

  या डिजिटल क्लासरूमचे उद्धाटन प्रसंगी असनिये सरपंचा सौ. रेश्मा सावंत, प्रशालेचे संस्थापक तथा माजी सरपंच एम. डी. सावंत, असनिये ग्रामसेवक मुकुंद परब, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष लक्ष्मण सावंत, ग्रामपंचायत सदस्य भरत सावंत, सुमन असनकर सौ. सुहासिनी ठिकार, पोलिस पाटील विनायक कोळापटे, असनिये पूर्ण प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. गवस, प्रशालेच्या मुख्याध्यापिका जान्हवी सावंत आदी उपस्थित होते.

या डिजिटल वर्गाचे उद्घाटन असनिये गावच्या सरपंच सौ. रेश्मा सावंत यांच्याहस्ते तर प्रशालेचे संस्थापक एम. डी. सावंत यांच्याहस्ते डिजिटल स्क्रिनचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रशालेचे जेष्ठ शिक्षक श्री. राठोड यांनी डेमोच्या माध्यमातून AI तंत्रज्ञानावर आधारीत स्मार्ट बोर्डचा अध्यापनात प्रभावी वापर कसा करता येईल याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

या स्मार्ट बोर्डला वाय-फाय कनेक्शन देण्यात आले असुन इंटरनेटच्या माध्यमातून विद्यार्थी कोणतीही माहिती सहज मिळवु शकतात. तसेच या स्मार्ट बोर्डमुळे अध्ययन व अध्यापन क्रिया सहज सोपी होवून विद्यार्थ्यांची आकलन क्षमताही वाढणार आहे. या कार्यक्रमाला शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी पालक, ग्रामस्थ, आजी माजी विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सहायक शिक्षक श्री. देसाई यांनी केले.