सावंतवाडी प्रतिनिधी: बदलापुर येथील ‘एक्सेल इंडिया प्रोटेक्टीव पेंट्स लिमिटेड या कंपनीकडून असनिये येथील श्री शिवछत्रपती माध्यमिक विद्यालय या प्रशालेतील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना ५० हजार रुपयांच्या गणवेश आणि इतर शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असनिये माजी सरपंच एम. डी. सावंत, एक्सेल इंडिया प्रोटेक्टीव पेंट्स लिमिटेड कंपनीचे व्यवस्थापक यशवंत सावंत, आना गावडे, संजय सावंत, दशरथ सावंत, प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीम. सावंत आदी उपस्थित होते.
असनिये गावचे सुपुत्र तथा एक्सेल इंडिया प्रोटेक्टीव पेंट्स लिमिटेड या कंपनी व्यवस्थापक यशवंत लाडू सावंत यांच्या प्रयत्नातून या कंपनीकडून असनिये येथील श्री शिवछत्रपती माध्यमिक विद्यालयाला ५० हजार रुपयाचा निधी प्राप्त झाला होता. या निधीतून या प्रशालेतील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना गणवेश आणि इतर शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.
यावेळी यशवंत सावंत यांनी या शाळेच्या शैक्षणिक विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. तर एम. डी सावंत यांनी पटसंख्ये अभावी ग्रामीण भागातील शाळा टिकवणे कठीण झाले असल्याची खंत व्यक्त करीत शाळा टिकवण्यासाठी विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ यांनी प्रयत्न करावेत असे आवाहन केले.
यावेळी यशवंत सावंत यांचा एम.डी. सावंत यांच्याहस्ते शाल व श्रीफळ देवुन सत्कार करण्यात आला. तसेच यावर्षी शालांत परीक्षेत प्रशालेतून प्रथम तीन क्रमांक प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचाही मान्यवरांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन परेश देसाई यांनी तर आभार श्री राठोड यांनी मानले.