सावंतवाडी: असनिये गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव शुक्रवारी १ डिसेंबर होत आहे. यानिमित्त रात्री सवाद्य पालखी मिरवणुकीनंतर संयुक्त दशावतार कंपनीचे नाटक होणार आहे. भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थानचे सर्व मानकरी आणि असनिये ग्रामस्थांनी केले आहे.